
Bandra Croma Showroom Fire : वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील स्क्वेअर मॉलच्या क्रोमा शोरूममध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Maharashtra | A fire broke out at a showroom in Mumbai. Fire tenders are present at the spot, and operations are underway to douse the fire. No causality has been reported.
— ANI (@ANI) April 29, 2025
More details awaited. pic.twitter.com/nHEssi80eH
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या क्रोमा शोरूमला आग लागली असून यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world