Bangladesh Illegal migration : बांगलादेशींनी राज्यभर हात-पाय पसरले, कोकणातून धक्कादायक प्रकार उघड

कोकणातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरू दळवी, प्रतिनिधी

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला करणारा बांगलादेशी असून चोरी करण्याच्या हेतूने तो सैफच्या घरात गेल्याचं समोर आल्यानंतर अवैधपणे बांगलादेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्यांचा मुद्दा चर्चेला आला आहे. बांगलादेशातील (Bangladesh Illegal migration) कित्येक नागरिक मुंबईसह राज्यातील अनेक भागात स्थानिक होण्यासाठी दाखल होतात. याचा व्यवस्थेवर परिणाम होतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)


दरम्यान कोकणातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कणकवलीतील एका लॉजमध्ये बांगलादेशी महिला देहविक्रय व्यवसाय करीत असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे कणकवलीतील एक मराठी तरुण हा लॉज चालवित होता. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली शहरातील लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२) याला  कणकवली पोलिसांनी ताब्‍यात घेतलं होते. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. बांगलादेशी  महिलांकडून लॉजवर देह विक्रय व्यवसाय करून घेत असल्‍याचा त्याच्यावर आरोप त्‍याच्यावर ठेवण्यात आला आहे.

नक्की वाचा - Bangladesh Illegal immigration : आरोपी शहजाद भारतात कसा आला? आधारकार्ड कुठून मिळालं? धक्कादायक खुलासा

एटीएस पथकाने पकडलेल्या दोन बांगलादेशी  महिलांकडून शहरातील लक्ष्मी लॉजवर देह विक्री व्यवसाय करवून घेत असल्‍याचे कणकवली पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सोमवारी रात्री आठच्या सुमारास कणकवली पोलिसांनी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे याला ताब्‍यात घेतले होते. त्‍याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्‍यावेळी अधिक तपासासाठी न्यायालयाने भावे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्‍यान एटीएसच्या पथकाने ताब्‍यात घेतलेल्‍या दोन बांगलादेशी महिलांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्‍या दोघींना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात धुळ्यातील एका खासगी लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये काही लोकांच्या संपर्कात असल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे. 

बांगलादेशींची घुसखोरी कशी होते?
जिथं जास्त रोजगाराच्या संधी असतील बांगलादेशी  असं ठिकाण निवडतात. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्डही असतं. त्याच्या आधारावर ते भारतात नोकरी करतात. कोणाला शंका येऊ नये म्हणून नावं बंगाली ठेवतात आणि आपण पश्चिम बंगालमधून आल्याचं सांगतात. त्यामुळे बांगलादेशींची वाढती घुसखोरी ही मोठी समस्या प्रशासनासमोर उभी ठाकली आहे.   
 

Advertisement