जाहिरात

Bangladeshi Illegal Immigrants : मुंबईत घुसखोरी करणारे बांगलादेशी पोलिसांच्या रडारवर, 3 आठवड्यात 50 जण अटकेत!

देशभराप्रमाणेच मुंबईतही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Bangladeshi Illegal Immigrants : मुंबईत घुसखोरी करणारे बांगलादेशी पोलिसांच्या रडारवर, 3 आठवड्यात 50 जण अटकेत!

देशभराप्रमाणेच मुंबईतही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या वर्षात मुंबईत येणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर एकूण 195 गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये एकूण 278 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 50 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या देशात पाठवण्यात आलं आहे. गेल्या तीन आठवड्यात मुंबईतील विविध भागातून 50 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बांगलादेशी नागरिक मुंबईत भाड्याच्या घरात राहतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे घरमालकांनी कोणालाही भाड्याने घर देताना आम्हाला माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीरपणे घाटकोपरमध्ये राहणाऱ्या तीन बांगलादेशींना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यावेळी शकील यारूल शेख (वय 23), आलम अलाउद्दीन शेख (वय 27), रसाल अकबर शेख (वय 32) तिघेही मूळचे बांगलादेशचे नागरिक आहेत.  

Parbhani Crime: तिसरी ही लेक झाली, नवरा संतापला अन् 30 वर्षीच्या पत्नी बरोबर भयंकर केलं

नक्की वाचा - Parbhani Crime: तिसरी ही लेक झाली, नवरा संतापला अन् 30 वर्षीच्या पत्नी बरोबर भयंकर केलं

हे सर्व आरोपी पनवेल येथे राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, हे लोक बांगलादेश सीमेवरून अवैधरित्या भारतात घुसले होते. बऱ्याचदा अवैधरित्या सीमा ओलांडून येत असताना काही एजंटमार्फत त्यांना मदत केली जात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे बांगलादेशींविरोधात कारवाई करताना याकडेही लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. अजूनही मुंबई व इतर आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करतात.तसेच त्यांच्याकडे अवैध पद्धतीने बनवलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आहेत. त्यामुळे आता याच घुसखोरांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान दहशतवादी विरोधी पथकावर आहे.

आतापर्यंत पोलिसांनी केलेली कारवाई

  •  गेल्या तीन वर्षात पोलिसांनी 696 बांगलादेशींवर कारवाई केली.
  •  कोर्टाच्या प्रक्रियेनंतर 222 घुसखोरांना मायदेशी परत पाठवण्यात आले.
  •  2024 मध्ये 181 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. 
  •  त्यापैकी 33 जणांना मायदेशी परत पाठवण्यात आले. 
  •  2023 वर्षी 368 घुसखोरांपैकी फक्त 68 घुसखोरांना मायदेशी परत पाठवण्यात आले. 
  •  2022 मध्ये 147 पैकी 21 जणांना मायदेशी घरी पाठवण्यात आले.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com