Baramati Crime: बसमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला, आरोपीने स्वत:वरही वार केले अन्.. बारामतीत काय घडलं?

Baramati Crime: एकाने अचानकच कोयता काढून दुसऱ्या तरुणावर वार करायला सुरुवात केली अशी माहिती बस वाहकाने दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती: बारामती इंदापूर एसटी मध्ये एकावर कोयत्याने वार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. चालू एसटीत एकानं कोयत्याने वार करत एका तरुणाला गंभीरित्या जखमी केल्याची माहिती मिळत असून हल्लेखोर तरुणाने देखील स्वतःवरती वार करून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केल आहे.बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी आली असता हा सगळा प्रकार घडलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर आगाराची ही बस असून ती बारामती वरून इंदापूरला निघाली होती. या बस मध्ये एकूण 60 प्रवासी होते. हल्ला झालेला तरुण आणि हल्लेखोर हे बसमध्ये पाठीमागील बाजूस बसले होते. एकाने अचानकच कोयता काढून दुसऱ्या तरुणावर वार करायला सुरुवात केली अशी माहिती बस वाहकाने दिली आहे.

Child Marriage : 40 वर्षाच्या विवाहित व्यक्तीनं केलं आठवीतल्या मुलीसोबत लग्न! काय आहे प्रकार?

दरम्यान यातील जखमी तरुण स्वतःच्या बचावासाठी पळून गेला तर ज्याने वार केले त्याने देखील स्वतःवर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांनी प्रवाशांनी या हल्लेखोराला पकडलं पोलिसांच्या ताब्यात दिले. या घडलेल्या प्रकाराने प्रवाशांमध्ये काही काळ भितीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

( नक्की वाचा : 6 वर्षांची नवरी, 45 वर्षांचा नवरा! अफगाणिस्तानातील धक्कादायक प्रकार, तालिबाननं दिला अजब आदेश )

Topics mentioned in this article