आकाश सावंत, बीड: गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यामधील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यामधील वंजारवाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वृक्षारोपणासाठी गैरहजर राहिल्याने माजी सरपंचांकडून निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वंजारवाडीमध्ये घडला आहे. या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृक्षारोपणाच्या कामात अनुपस्थित राहिल्याचा राग मनात धरून गावचे माजी सरपंच वैजनाथ तांदळेसह त्याच्या सहकाऱ्यांनी गावातील एका माजी सैनिकाच्या कुटुंबाला अमानुष मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या बीडच्या वंजारवाडी या गावात गाव सुशोभीकरणासाठी सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.
Pahalgam Attack: 'आम्ही विरोधक असलो तरी...', शशी थरुर- ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल
या मारहाणीमध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सात जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वंजारवाडी गावात पंचायत समितीच्यावतीने रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमासाठी गावकऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.
याच वृक्षरोपणाला निवृत्त सैनिक कुंडलिक तांदळे यांचे कुटुंब आले नव्हते. याचाच राग मनात धरून माजी सरपंच वैजनाथ तांदळे आणि सहकाऱ्यांनी घरावर हल्ला करत कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.