Beed News: थाटामाटात लग्न, पण नवरीने कहर केला; हळद उतरण्याआधीच... बीडमधील घटनेने खळबळ

चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच हळदीच्या अंगाने नवरी आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अक्षय सावंत, बीड: प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता बीडमधून  समोर आली आहे. चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच हळदीच्या अंगाने नवरी आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी  नववधू आपल्या माहेरच्या गावातून चक्क प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या केज तालुक्यात बी घटना घडली. 9 मे रोजी केज तालुक्यातील एका मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्यात तालुक्यातील अनेक मान्यवर नेत्यांनीही हजेरी लावली होती व नवदाम्पत्याला शुभाशीर्वादही दिले होते, मात्र त्यानंतर नवरीने केलेल्या प्रतापाने सर्वांनाच धक्का बसला. 

शुक्रवारी दुपारी केज तालुक्यातील एका खेड्यातील नववधूचे शुभमंगल झाले. लग्न लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्यांनी जोडीने देवदर्शनही केले. त्यानंतर रविवारी तिला मुराळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र, त्याच रात्री या नववधूने रात्री नैसर्गिक विधीला जाण्याच्या बहाण्याने भावजयीचा मोबाईल घेतला आणि माहेरच्या गावाशेजारीच असलेल्या प्रियकराशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.

(नक्की वाचा-  अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरामध्ये ड्रेसकोड, देवस्थान समितीचं भाविकांना आवाहन)

उन्हाळ्याचे त्यानंतर दिवस असल्याने ती एकटीच घरात झोपली व तिचे इतर सर्व नातेवाईक अंगणात झोपी गेले. सोमवारी पहाटे नवरी मुलगी झोपलेल्या घरातील वीज बंद असल्याचे तिच्या आईला दिसून आले. त्यामुळे तिने घरात जाऊन पाहिले असता मुलगी आढळून आली नाही नंतर जवळच्या नातेवाईकांकडे सर्व तिचा शोध घेतला असता नववधू कोणाकडेही आढळली नाही. अखेर भावाने केज पोलिस ठाण्यात नववधू असलेली बहीण हरवल्याची तक्रार सोमवारी दिली.

Advertisement

दरम्यान, या नववधूने प्रियकरासोबत पळून जाताना सासरच्या मंडळीने लग्नात घातलेले झुंबर, मंगळसूत्र व इतर दागिन्यासह स्वतःचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह पोबारा केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा- Shirdi News: दुबईतून शिर्डीत आले 'गोल्डन ॐ साई', साईभक्ताकडून भरभरुन दान, किंमत किती?)

Topics mentioned in this article