बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीपासून भ्रष्टाचाराबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडेंसोबत घनिष्ठ संबंध आहेत. मात्र वाल्मिक कराड याचा बीडमधील अनेक गुन्ह्यांमध्ये हात असल्याचा आरोप केल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकीय दबाव सुरू असताना आता दुसऱ्या पत्नीमुळेबी त्यांच्या अडचणी वाढल्याचं दिसून येत आहे. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा मुंडे आता मैदानात उतरल्या आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेत याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Exclusive : मुंडे, कराड, गुंडाराज अन् लाल डायरी... सुरेश धस एवढे आक्रमक का झाले?
सुरेश धसांकडून टीका
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं मूळ हे पवनचक्की प्रकल्पावर झालेला किरकोळ वाद आहे. पवनचक्की प्रकल्पातील कंपनीकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप करताना सुरेश धस यांनी म्हटलं की, विंड पॉवर एनर्जी 2011-12 मध्ये रिन्यू पॉवर एनर्जी कंपनीच्या माध्यमातून आष्टीमध्ये पहिल्यांदा आली. त्यांनी 300 ते 600 मेगावॅटचं काम देखील केलं. त्यानंतर दुसरी कंपनी आली. मात्र आमच्याकडे कुठला धांगडधिंगा झाला नाही. आम्हाला एवढे द्या, तेव्हढे त्या असं आमच्याकडे काही झालं नाही. आता ज्या नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत, त्या आमच्याकडे झाल्या नाहीत. 'आकां'च्या कानावर घालूनचं हे सर्व सुरु आहे. त्यामुळे मोठ्या 'आकां'नी मंत्रिपद, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पॉवर ऑफ अॅटर्नी दिल्यासारखे वाल्मिकी कराडला दिले होते, अशी टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केली.