Beed Crime: गवंड्याकडे बंदूक... संशयास्पद मृत्यूने खळबळ, ऐन दिवाळीत बीड हादरलं!

तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड: राज्यभरात दिवाळीची धामधुम सुरु असतानाच बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.  ऐन दिवाळीत बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडमधील मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.  अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याचा अधिक तपास केला असता मयूरच्या छातीत गोळी लागण्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्टल आढळून आले. 

गुरु माँ निघाला बाबू खान! बांगलादेशी किन्नरचे मुंबईत साम्राज्य, संपत्ती पाहून पोलिसही हादरले

महत्त्वाचं म्हणजे  मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून? त्याची हत्या की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे. घटनेचा अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत. मात्र ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील  खुनाची मालिका सुरू झालेली असून आहे, काही दिवसांपूर्वी मुलाने आईचा खून केल्याची घटना घडलेली होती. खुनाची घटना ताजी असतानाच आज  दुपारी तासगाव आणि पारधी समाजातील चेतन उर्फ बुलेट पवार (वय ४५) या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. तर सांगलीत ही खुनाची घटना घडली आहे,किरकोळ कारणातून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झालेली आहेत.

Advertisement

Akola News : 'रात्री भेट, पगाराचं काम करून देतो'; तहसील कार्यालयातील संतापजनक प्रकार 

Topics mentioned in this article