
योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला.
Akola Crime : अकोल्याच्या तहसील कार्यालय विभागातील संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहाय्यक खुळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महसूल सहाय्यकाने कार्यालयीन कामाच्या निमित्ताने तिच्याशी संपर्क साधला आणि मोबाईलवरून वारंवार फोन करून कार्यालयात बोलावले.
नेमकं काय आहे प्रकरण?
अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत तहसील कार्यालयात एका विधवा महिलेला पगार लावून देतो असे म्हणत तिने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला तहसील कार्यालयात गेल्यानंतर महसूल सहाय्यक खुळे यांनी तिचा हात पकडला आणि रात्री भेटल्यास पगाराचे काम करून देतो, असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केले. याचवेळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर देखील "तू मला भेट" असे सांगून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप महिलेने पोलिसांकडे केला आहे.
नक्की वाचा - Dog bite: कुत्रा चावला पण दुर्लक्ष केलं, 2 महिन्यांनी तरुणाची भीषण अवस्था; तडफडत रुग्णालयातच मृत्यू
पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!
महिलेच्या लिखित तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ भारतीय दंड संहितेच्या संबंधित ७४ कलमान्वये महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गंभीर प्रकरणात प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष?
दरम्यान, घटनेनंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका विधवा महिलेबरोबर झालेल्या या प्रकारामुळे शासनाच्या विश्वासार्ह योजनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सध्या सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, संबंधित महसूल सहाय्यकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world