
Bangladeshi transgender Arrested: मुंबई पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. सुमारे ३० वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या (Fake Documents) आधारे भारतात (India) वास्तव्य करणाऱ्या एका बांग्लादेशी किन्नरांच्या गुरु माँला अटक केली आहे. बाबू अयान शेख उर्फ 'ज्योती' उर्फ 'गुरु मा' अशी या आरोपीची ओळख असून, शिवाजी नगर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
गुरु माँ निघाली बाबू खान..
पोलिस सूत्रांनुसार, 'ज्योति' उर्फ 'गुरु मा' हिचे नेटवर्क केवळ मुंबईपुरते मर्यादित नव्हते. ती बांग्लादेशमधून बेकायदेशीरपणे लोकांना भारतात आणण्याचे मोठे रॅकेट (Racket) चालवत होती. प्राथमिक तपासात तिने आतापर्यंत २०० हून अधिक बांग्लादेशी नागरिकांना भारतात आणले असल्याचे उघड झाले आहे, आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 'गुरु मा' ने स्वतःला भारतीय नागरिक (Indian Citizen) दाखवण्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी अनेक बनावट कागदपत्रे तयार केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या चौकशीत ही सर्व कागदपत्रे बनावट आढळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
Akola News : 'रात्री भेट, पगाराचं काम करून देतो'; तहसील कार्यालयातील संतापजनक प्रकार
हे रॅकेट सुरुवातीला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद सीमेवरून लोकांना अवैधपणे भारतात आणत असे. त्यानंतर, त्या लोकांना कोलकाता येथे ४ ते ५ दिवसांसाठी थांबवून त्यांचे बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जन्म दाखले बनवले जात असत. त्यानंतर त्यांना मुंबईत आणले जात असे, जिथे 'ज्योति' त्यांना शिवाजी नगर परिसरात आश्रय देत असे. 'गुरु मा' चे मुंबईच्या विविध भागांमध्ये ३०० हून अधिक अनुयायी (Followers) पसरलेले आहेत. मुंबईत आल्यावर, एकाच खोलीत ३ ते ४ लोकांना ठेवून त्यांच्याकडून दरमहा ५,००० ते १०,००० रुपये इतकी मोठी रक्कम ती वसूल करत असे.
शेकडो भक्त अन् २० घरे...
पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले आहे की, 'ज्योति'चे काम केवळ अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रे बनवणे इतकेच नव्हते, तर ती म्हाडाचे फ्लॅट आणि झोपडपट्ट्या हडप करण्यासारख्या गुन्ह्यांमध्येही सामील होती. एक घर खाली करण्यासाठी ती १ ते २ लाख रुपये वसूल करत होती. सूत्रांच्या दाव्यानुसार, 'गुरु मा' ने २०० हून अधिक घरांवर कब्जा केला असून, ते भाड्याने देऊन ती दरमहा मोठी रक्कम कमवत होती. 'गुरु मा' ने अनेक लोकांना तृतीयपंथी बनवले आणि काहींना देह व्यापारामध्ये ढकलले, यासाठी ती त्यांना वेगवेगळ्या हायवे (Highway) परिसरांमध्ये पाठवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Ratnagiri News: संताच्या वेषात नराधम! भगवान कोकरेविरोधात दुसरी लैंगिक अत्याचाराची तक्रार
दरम्यान, सध्या पोलिसांनी आरोपी 'गुरु मा' उर्फ बाबू अयान शेख हिच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्य, मानव तस्करी (Human Trafficking) आणि फसवणूक (Fraud) यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणा या नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांचा आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world