Beed News : भीतीमुळे शिक्षण थांबले! सहावीतील पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यालयात फोडली वाचा; बीडची सुन्न घटना

Beed News : बीड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed News : पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, मुलगी तिच्या मामाकडे गेल्याची माहिती समजली. (प्रतिकात्मक फोटो)
बीड:

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : बीड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे आणि भीतीपोटी त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षणही थांबवले आहे.

या प्रकरणात सुरुवातीला मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, परंतु पीडितेने स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन घडलेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 5 नोव्हेंबर रोजी घडली. पीडितेची आई कामासाठी बाहेर गेली असताना, मुलगी घराबाहेर खेळत होती. आई घरी परतल्यानंतर मुलगी घरातून गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर, पीडितेच्या आईने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.

( नक्की वाचा : Sindhudurg News : मोबाईलमधील रहस्यामुळे प्रेमकथेची शोकांतिका,तरुण जोडप्याच्या निर्णयानं सिंधुदुर्गात खळबळ )

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, मुलगी तिच्या मामाकडे गेल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू केली आणि या संदर्भात दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पत्रव्यवहारही करण्यात आला होता.

Advertisement

या घटनेला वेगळे आणि गंभीर वळण दिनांक 26 नोव्हेंबर या दिवशी मिळाले. पीडित अल्पवयीन मुलगी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली आणि तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची गंभीर बाब मोठ्या धाडसाने सांगितली. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सूरजकुमार धोंडीराम खांडे (वय 22, रा. म्हाळसजवळा) नावाच्या ओळखीच्या व्यक्तीने तिच्यावर जबरदस्ती केली होती.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

मुलीच्या या तक्रारीनंतर, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली. अपहरणाच्या मूळ गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) तसेच पॉक्सो (POCSO) आणि अॅट्रॉसिटी (SC/ST Act) कायद्यांतर्गत संबंधित गंभीर कलमे वाढवण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सूरजकुमार खांडे याला अटक केली आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article