- पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर कारवाई सुरू केली आहे.
- या कारवाईत अनधिकृत मंदीर मस्जिद पाडण्यात आल्या आहे
- कारवाई करताना मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. दगडफेक झाल्याचं ही बोललं जात आहे
सूरज कसबे
सध्या अनेक शहरांना अनधिकृत बांधकामांनी विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वर्ष ही अनधिकृत बांधकामं होत असतात. वर्षोनी वर्ष ही बांधकामं त्याच ठिकाणी राहील्यानंतर त्या जागेवरच हक्का सांगितला जातो. शिवाय ती अधिकृत करावी याची ही मागणी रेटली जाते. त्यामुळे सरकारी जागा अशी हडपली जाते. मात्र याला आळा घालण्याचा विडा पिंपरी चिंचवड महापालिकेने उचललं आहे. जी काही अनधिकृत बांधकामं असतील त्या विरोधात थेट कारवाई केली जात आहे.
पिंपरीच चिंचवड शहराला अनधिकृत बांधकामांनी विळखा घातला आहे. अनेक सरकारी आणि खाजगी जागांवर मंदीरं आणि मस्जिदी ही उभ्या आहेत. त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने थेट कारवाई केली. अनेक मंदीर आणि मस्जिद बुलडोजरने जमिनदोस्त करण्यात आल्या अशी माहिती शहराचे महापौर रवी लांडगे यांनी दिली. ही कारवाई विशिष्ट जात, धर्मा विरुद्ध नाही. काही मंदीरं ही पाडली गेली आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. अनधिकृत बांधकामांमध्ये काही बुद्ध विहार आणि चर्च ही आहेत. ते ही पाडली जातील असं ही त्यांनी सांगितलं आहे.
शहरातील जवळपास अकरा अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे. ही बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. महापालिकेने मध्यरात्री पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाल्याची ही चर्चा आहे. काही ठिकाणी दगडफेक ही झाली आहे. त्याचा एक व्हिडीओ ही समोर आला आहे. यावेळी तणाव निर्माण झाला होता. ही कारवाई महापालिका क्षेत्रातील कुदळवाडी, पवार वस्ती, चिखली या भागात झाला.
नक्की वाचा - Anaya Bangar: अनाया बांगरला कोण आवडतं? पहिल्यांदाच मन मोकळं केलं, सांगितलं, पुरूष की...
दरम्यान या दगडफेकीत काही पोलीस , महापालिका कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचं ही बोललं जात आहे. मात्र पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंनी असा कोणता संघर्ष झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारवाई वेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेऊन कारवाई पार पाडल्याचा दावा महापौरांनी केला आहे. शिवाय मोकळ्या केलेल्या जागा महापालिका ताब्यात घेईल. त्या ठिकाणी सीमा बंदी केली जाईल. शिवाय वृक्षारोपण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनधिकृत बांधकामा विरोधातील ही कारवाई सुरूच राहील असं ही त्यांनी सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world