जाहिरात

माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव

Kalpana Kharat News : कल्पना खरातचे लग्नाआधीचे नाव सुनीता शिंदे होते. पाडळी गावातील एका अत्यंत साध्या, 10 बाय 10 च्या झोपडीवजा घरात तिचे बालपण गेले.

माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव
Ashok Kharat Wife : अशोक खरातच्या बायकोबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
नाशिक:

Ashok Kharat Wife Kalpana Kharat News : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात सध्या फरार असून पोलिसांनी तिच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. 

ज्या महिलेने अवाढव्य संपत्ती आणि ऐशोआरामात लग्नानंतरचे आयुष्य व्यतीत केले, तिचे बालपण नेमके कसे होते, याचा शोध घेण्यासाठी NDTV मराठीची टीम नाशिकपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाडळी या डोंगराळ भागात पोहोचली. तिथे जे वास्तव समोर आले, ते पाहून कोणालाही धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

कसा झाला ऐश्वर्याकडे प्रवास?

कल्पना खरातचे लग्नाआधीचे नाव सुनीता शिंदे होते. पाडळी गावातील एका अत्यंत साध्या, 10 बाय 10 च्या झोपडीवजा घरात तिचे बालपण गेले. आजही या घरात तिची आई, भावजय आणि लहान भाचा असे कुटुंब राहते. 

घरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. गावात शाळा नसल्याने लहानपणी सुनीताला तब्बल 4 किलोमीटरची पायपीट करून शाळेत जावे लागत असे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून गेलेल्या सुनीताचे आयुष्य अशोक खरातशी लग्न झाल्यानंतर पूर्णपणे बदलून गेले.

( नक्की वाचा : Ashok Kharat : 'कुणावरही जबरदस्ती केली नाही, जे केलं ते...'; भोंदू खरातने पोलिसांना काय सांगितलं? वाचा सविस्तर )
 

वयात मोठे अंतर असूनही लग्न

सुनीता उर्फ कल्पनाचे वडील आणि मोठ्या भावाचे अपघाती निधन झाले आहे. 2009 मध्ये भावाचा शेतात विजेचा धक्का लागून तर 2023 मध्ये वडिलांचा जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. एका नातेवाईकाने अशोक खरात आणि सुनीताचे लग्न जुळवून आणले होते. अशोक आणि सुनीताच्या वयात मोठे अंतर होते, मात्र लग्नाचा सर्व खर्च खरात कुटुंब करणार असल्याने वडिलांनी हे लग्न लावून दिले होते. मात्र, लग्नानंतर सुनीताचे तिच्या माहेरच्या लोकांशी असलेले संबंध पूर्णपणे तुटले.

20 वर्षांपासून माहेरशी संपर्क नाही

गेल्या 20 ते 22 वर्षांपासून आमचा सुनीताशी कोणताही संबंध नाही, साधा फोनही तिने कधी केला नाही, असे तिची भावजाई सांगते. अशोक खरात हा सुनीताला माहेरी येऊ देत नसे, असेही समोर आले आहे. तिचा भाचा सूरजनं सांगितलं की, त्याची आत्या स्वभावाने अत्यंत गरीब होती. अशोक खरातने केलेल्या या सर्व फसवणुकीच्या प्रकारांमुळे तिचे माहेरचे शिंदे कुटुंब सध्या मोठ्या धक्क्यात आहे.

पोलिसांकडून लूक आऊट नोटीस आणि शोधमोहीम

शिर्डीतील एका जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह कल्पनावरही गुन्हा दाखल आहे. एसआयटीने जेव्हा खरातच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांचा मुलगा हर्षवर्धन पोलिसांच्या हाती लागला, मात्र कल्पना तिथून पसार झाली. आता कल्पना महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर या भोंदू कॅप्टनच्या अनेक गुप्त व्यवहारांचा आणि फसवणुकीच्या नव्या पद्धतींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com