
Bhopal love trap, Rape And Blackmailing Case : 1992 साली झालेलं अजमेर बलात्कार प्रकरण आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्याच प्रकारची भयंकर घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उघड झाली आहे. यामध्ये एका खासगी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थींंवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे प्रकरण 2017 साली सुरु झाले होते.हे सर्व आरोपी एका विशिष्ट समुदायाचे आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
2017 साली या टोळीतील एका आरोपीनं विद्यार्थीनीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ देखील शूट केला. त्यानं तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीच्या मैत्रिणींवरही अत्याचार केले. पीडिताच्या माध्यमातून त्यांनी तिच्या मैत्रिणींना बोलावलं. त्यांच्यावर अत्याचार केले. व्हिडिओ तयार करत त्यांनाही फसवलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेली 8 वर्ष ही टोळी सक्रीय होती. तरीही त्यांना कुणीही पकडलं नाही.
इंदोरमध्येही झाले अत्याचार
या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली असून दोन आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. वास्तविक आरोपी आणि पीडित मुली एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथंच त्यांची ओळख झाली. काही काळ सर्व ठीक होते. त्यानंतर आरोपीनं पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडिता इंदोरमध्ये गेली होती. तिथंही तिच्यावर अत्याचार झाले. भोपाळमध्ये परत आल्यानंतरही त्रास देणे सुरुच होते.
( नक्की वाचा : 'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग )
धर्मांतरासाठी जबरदस्ती
पीडित तरुणीनं काही दिवसांपूर्वीच तिच्या कुटुंबीयांना सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार 4 पैकी एक पीडिता हे अत्याचार झाले त्यावेळी अल्पवयीन होती. इतकंच नाही तर या तरुणींना धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यांनी धर्मांतरास नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी सर्व गुन्ह्यांवर कारवाई करत पॉक्सो कलम तसंच धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमाच्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी आरएस मुखर्जी यांना या प्रकरणात विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर पोलिसांना त्यांच्या तपासा पूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world