60 Year Old Woman Marries 35 Year Old Man : प्रेमाची कोणतीही सीमा किंवा वय नसते असे म्हणतात, आणि याच गोष्टीचा प्रत्यय देणारी एक अजब प्रेम कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वयाचे अंतर आणि सामाजिक बंधने झुगारून एका 60 वर्षांच्या महिलेने आपल्यापेक्षा तब्बल 25 वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या प्रेमाचा गौप्यस्फोट भररस्त्यात झाला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला.
भररस्त्यात हायहोल्टेज ड्रामा
ही संपूर्ण खळबळजनक घटना बिहारमधील बांका जिल्ह्यात घडली आहे. बांका जिल्ह्यातील अमरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकावर हा सर्व प्रकार घडला, ज्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.
येथील सार्वजनिक बस स्थानकावर रविवारी अचानक गोंधळ सुरू झाला. एका बाजूला 60 वर्षांची महिला आणि 35 वर्षांचा तरुण उभे होते, तर दुसरीकडे त्या महिलेचा पती आणि मुलगा त्यांचा रस्ता अडवून उभे होते. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
महिलेच्या पतीने आणि मुलाने त्या तरुणाला रंगेहाथ पकडून त्याला चोप द्यायला सुरुवात केली. हा राडा इतका वाढला की बघ्यांची मोठी गर्दी जमली आणि नेमकं प्रकरण काय आहे हे समजल्यावर सगळेच अवाक झाले.
( नक्की वाचा : Techie Murder: 18 वर्षांचा मुलगा आणि इतकी क्रूरता? खिडकीतून घरात शिरला आणि महिला इंजिनिअरला...अंगावर येईल काटा )
रॉन्ग नंबरने फिरवले आयुष्याचे चाक
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका साध्या रॉन्ग नंबरने झाली होती. सुमारे 4 महिन्यांपूर्वी या महिलेच्या फोनवर आरा येथील रहिवासी वकील मिश्रा याचा फोन आला. फोनवर सुरू झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. हे प्रेम प्रकरण इतकं वाढलं की दोघांनीही घरादाराचा विचार सोडून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ते दोघे गुपचूप भागलपूर रेल्वे स्टेशनवर भेटले आणि तिथून थेट लुधियानाला पळून गेले. महिलेने पोलिसांना सांगितले की, त्यांनी तिथे लग्न केले असून ते आता पती-पत्नी म्हणून राहत आहेत.
कुटुंबाचा आक्रोश आणि....
एकीकडे महिला आपल्या प्रेमावर ठाम असली, तरी तिच्या पतीला आणि मुलांना हे स्वीकारणे कठीण जात आहे. आपल्या आईने आणि पत्नीने अशा प्रकारे वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी नाते जोडल्यामुळे कुटुंबाचे रडून हाल झाले आहेत. संतप्त नातेवाईकांपासून वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या प्रेमी युगुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाजू तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world