
Bihar Love Story: बिहारमधील एका विवाहीत महिलेचा पुतण्यावर जीव जडला होता. ही बाब नवऱ्याला कळाल्यानंतर त्याने या सगळ्याला आक्षेप घेतला. नवऱ्याला आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल कळाल्याचे समजल्यानंतर आयुषी नावाची ही महिला आपल्या पुतण्यासोबत पळून गेली. तिने सचिन नावाच्या पुतण्यासोबत लग्न केलं असून या सगळ्या प्रकारामुळे आयुषीचा नवरा विशाल दुबे हा उद्ध्वस्त झाला आहे. आयुषी ही 24 वर्षांची असून तिचे 2021 साली लग्न झालं होतं. सुरूवातीला सगळं व्यवस्थित सुरू होतं, मात्र आयुषीला त्यांच्या घराशेजारी राहणारा सचिन आवडायला लागला होता. सचिन हा विशालचा पुतण्या आहे, हे माहिती असूनही आयुषीचा त्याच्यावर जीव जडला होता. सचिनलाही त्याची 'चाची' आवडायला लागली होती.
( नक्की वाचा: एक-दोन नाही तर पाच लग्न करणारी महिला पडली दीराच्या प्रेमात! )
आयुषी आणि सचिनचं सुरू होतं गुपचूप, गुपचूप
दोन वर्ष सचिन आणि आयुषीमध्ये गुपचूप प्रकार सुरू होता. मात्र एकेदिवशी या दोघांची पोलखोल झाली आणि विशालला त्याच्या पाठीमागे काय प्रकार सुरू आहे हे कळाले. भडकलेल्या विशालने आयुषीला जाब विचारला होता. हे सगळे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. प्रकरण गळ्याशी येतंय हे कळाल्यानंतर आयुषी आणि सचिन घरातून पळून गेले. 5 दिवसानंतर हे दोघे परतले आणि विशालसमोरच या दोघांनी लग्न केले.
(नक्की वाचा: होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ)
चूक नसताना ऐकावे लागतायत टोमणे
बिहारच्या जमुईमधला हा प्रकार असून ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर विशाल नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. या सगळ्या प्रकारावरून त्याला तऱ्हेतऱ्हेचे टोमणे ऐकावे लागत आहे. आपली काहीही चूक नसताना ही वेळ आपल्यावर का यावी असा प्रश्न विशालला पडला आहे. विशाल हा फ्लिपकार्टमध्ये नोकरी करत होता. घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती आणि तो सगळी जबाबदारी नीटपणे पार पाडत होता. या सगळ्याप्रकरणानंतर विशालला लाज वाटू लागली असून त्याने नोकरी सोडून दिली आहे. त्याने आता चहाचा स्टॉल लावला असून लग्नाबद्दल आपल्या मनात तिटकारा निर्माण झाल्याचे तो सांगतोय. जर आयुषी पुन्हा माझ्या आयुष्यात आली तर मी जीव देईन अशी धमकीच त्याने दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world