Titwala News: एकीकडे मराठी- हिंदीवरुन वाद सुरु असतानाच टिटवाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टिटवाळा परिसरात पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या वादातून मराठी कुटुंबांना मारहाणीची घटना घडली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे मात्र मनसे कडून संबंधित परप्रांतीय व्यक्तींवर ठोस कारवाईची मागणी केली गेली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा...
honeybee Attack: आरडा ओरडा, धावपळ.. अजिंठा लेणीत धक्कादायक प्रकार; 100 पर्यटक जखमी
परप्रांतियाकडून मराठी कुटुंबाला मारहाण
याबाबत सविस्तर बातमी अशी की, मोरया नगरी परिसरात राहणारे योगेश शिंदे यांच्या आरोप आहे की, त्यांच्या भागात पाईपलाईनमधून सतत पाणी गळती होत होती. याबाबत संबंधित बिल्डरकडे तक्रार करण्यात आली होती पाईपलाईन दुरुस्तीचे काम किती वेळा करू असे सांगून बिल्डरने काम करण्यास नकार दिला. अखेर रहिवाशांनी स्वखर्चाने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला.
या कामाबाबत शेजारी राहणाऱ्या सुनील भाटन यांना देखील माहिती देऊन सहमती घेण्यात आली होती. मात्र, काम सुरू करण्याच्या मुद्द्यावरून अचानक वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. योगेश शिंदे यांच्या आरोपानुसार, सुनील भाटन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत मला व माझ्या आईला बांबूने मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी दिलीप राठोड आणि अविनाश शिकवंदे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत पीडित कुटुंबाला मदत केली. तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत टिटवाळा पोलिसांनी सांगितले की, घटनेची तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world