Palghar Crime : 15 एकर जमिनीसाठी तो झाला 'IAS अधिकारी', खरेदी खत समोर येताच तरुणाचा प्लान उघड

पालघर जिल्ह्यातील सफाळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी 

पालघर जिल्ह्यातील सफाळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तोतयेगिरी आयएएस अधिकाऱ्याने जमीन हडपण्याचा प्लान केला होता. महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला आहे. 

पालघरमधील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील IAS अधिकारी असल्याचं दाखवून जमीन हडपण्याचा प्लान महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे  उधळण्यात आला आहे. सफाळे येथे जमिनीचा फेरफार नावावर करण्यासाठी कागदपत्रे दाखल करतेवेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात तोतयेगिरी करणारा आयएएस अधिकारी प्रतीक मोहन पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - India Pakistan Tension : 'भारतीय लष्कराचे धन्यवाद', कोल्हापुरातील दाम्पत्याची बचतीच्या पैशातून सैन्याला 5 लाखांची मदत

सफाळे येथील मंडळ अधिकारी तेजल पाटील यांनी सफाळे पोलीस ठाण्यात जयवंत दांडेकर यांच्या मालकीच्या 15 एकर जागेवर बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या घटनेबाबत पोलिसांनी तपास करीत प्रतीक पाटील याला चिंचणी येथून ताब्यात घेत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सफाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

नेमकं काय घडलं?

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याचं खोटं भासवून सफाळे मंडळ अधिकारी येथे फेरफारसाठी प्रतीक पाटील यांनी कागदपत्रे दाखल केले असताना आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं. मंडळ अधिकारी तेजल पाटील यांना तपास केल्यानंतर कागदपत्रांमध्ये फेरफार असल्याचे जाणवले. याबाबत त्यांनी संबंधित जमीन मालक जयंत दांडेकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतंही खरेदी खत दिले नाही असे सांगितले. याबाबतचा संशय आल्यामुळे मंडळ अधिकारी यांनी खबरदारी घेत चौकशी केली असताना त्या कागदपत्रात फेरफार केल्याचं आढळून आलं. तेजल पाटील यांनी सफाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. त्याचप्रमाणे जयवंत दांडेकर  यांच्या मालकीची 15 एकर जागेचे बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सदरच्या घटनेबाबत पोलिसांनी तपास करीत प्रतीक पाटील याला चिंचणी येथून ताब्यात घेत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सफाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Topics mentioned in this article