
विशाल पुजारी, प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यानंतर भारतीय सैन्य दलाने एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर विविध प्रकारे हल्ले सुरू असून त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे भारतात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरसाठी कोल्हापुरातील दाम्पत्याने भारतीय लष्कराला पाच लाखांची आर्थिक मदत केली आहे. यावेळी भारतासह आशिया खंडातील दहशतवाद नष्ट करावा अशी भावना या वृद्ध दाम्पत्याने व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हेमकिरण रामचंद्र पणदूरकर असं या दाम्पत्याच नाव आहे. भारतीय सैनिकांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच मनोधैर्य वाढविण्यासाठी ही मदत करण्यात आली आहे. कोल्हापुरातील या पणदूरकर दाम्पत्यांनं पाच लाखांचा धनादेश नॅशनल डिफेन्सकडे रवाना केला आहे. दरम्यान भारतीय लष्करासाठी देशभरातील नागरिकांनी लष्कराला आर्थिक मदत करण्याचं आवाहन पणदूरकर कुटुंबीयांनी केलं आहे.

शिवाय डॉक्टर अँड. रूपाली पणदूरकर या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ हे पणदूरकर दाम्पत्य अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेत आहेत..राम पणदुरकर आणि त्यांच्या पत्नी हेमकिरण पणदूरकर यांचे या सामाजिक कार्याबद्दल समाजातून कौतुक होत आहे..दरम्यान भारतासह आशिया खंडातील दहशतवाद नष्ट करावा अशा भावना ही पणदूरकर दाम्पत्यांनी व्यक्त केल्यातं.
पाच लाखांचा धनादेश नॅशनल डिफेन्सकडे रवाना
पणदूरकर दाम्पत्यांनं पाच लाखांचा चेक नॅशनल डिफेन्सकडे रवाना केला आहे. भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधी, म्हणजेच नॅशनल डिफेन्स फंड" यासाठी रुपये पाच लाख एवढी देणगी, पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे या ठिकाणी रवाना झालेला आहे. या निधीसाठी दिलेली रक्कम, अंडर सेक्रेटरी (फंड्स) पीएमओ, साऊथ ब्लॉक , नवी दिल्ली 11 येथे पाठविण्यात आली आहे.
नक्की वाचा - India Pakistan Tension : पाकिस्तानशी लढताना BSF चे मोहम्मद इम्तियाज यांना वीरमरण; कुटुंबावर शोककळा
लेकीच्या स्नरणार्थ अनेक सामाजिक उपक्रम..
यापूर्वीही पणदूरकर दाम्पत्याने अनेक सामाजिक उपक्रमात हिरहिरीने सहभाग घेतला आहे. त्यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात कमवा आणि सिका या योजनेअंतर्गत गरीब मुलींसाठी अभ्यासिका उभारणीसाठी ६० लाखांची देणगी दिली होती. यातून त्यांची दिवंगत कन्या कैलासवासी, डॉक्टर, विद्धिज्ञ रूपाली पणदूरकर अभ्यासिका बांधण्यात आली. त्यानंतर आता त्यांनी भारतीय लष्करासाठी मदत केली आहे. त्यामुळे समाजातून त्यांचं कौतुक होतं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world