अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील जामवाडी येथे चारचाकी वाहन विहिरीत पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जामवाडी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गाडी गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जामवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पडली होती. बोलेरो गाडी या खडी वरून घसरत गेली. त्यामुळे चालकाचेही गाडीवरचे नियंत्रण सुटले. यावेळी गाडीत चार जण होते. गाडी घसरल्याने तिने मुख्य रस्ता सोडला. ती अक्षरशा घसरत गेली. त्यामुळे चालकासह गाडीत असलेल्यांना काय होतं हे समजलंच नाही.
गाडी घसरत थेट शेजारीच असलेल्या विहीरत जाऊन पडली. त्यावेळी अजूबाजूला कोणीच नव्हते. विहीर पाणी होतं. त्यामुळे गाडीतूनही कोणाला बाहेर पडता आलं नाही. ज्यावेळी लोकांना या अपघाता बाबात समजलं त्यावेळी उशीर झाला होता. त्यानंतर क्रेन बोलवावी लागली. त्याच्या सहाय्याने गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेत रामहरी शेळके, अशोक शेळके, किशोर पवार आणि चक्रपाणी बारस्कर यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने मृतदेह आणि चारचाकी वाहन बाहेर काढण्यात आले. या अपघाताने एकच खळबळ उडाली. शिवाय वाईट रस्त्यामुळे हा अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world