Dombivli Viral Video : डोंबिवलीत पुन्हा एकदा स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बाईकवर उभं राहून एक तरुण बाईक चालवून स्वत:चा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मोठा गाव-मानकोली परिसरात तरुणांकडून जीवघेणे स्टंट सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
डोंबिवलीतील मोठा गाव-मानकोली परिसरात स्टंटबाज तरुणांचा त्रास वाढतच चालला आहे.यापूर्वीही अनेक वेळा येथे स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र,तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत.आता पुन्हा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये एक तरुण थेट बाईकवर उभं राहून बाईक चालवत असल्याचे दिसत आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांच्या अपघाताचं अशोक खरात कनेक्शन? ईशान्येश्वर मंदिरात अघोरी पूजा अन्..अमोल मिटकरींनी उडवली खळबळ
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका
— Naresh Shende (@NareshShen87640) April 24, 2026
हा संपूर्ण धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.या स्टंटबाजीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. पोलिसांनी या स्टंटबाज तरुणांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी येथील स्थानिक तरुणांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world