Beed News: मामा-मामी रात्री शेतात गेले, भाचाची नियत फिरली, मामाच्या मुलीसोबत घरात केला संतापजनक प्रक्रार

बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजोबांनी नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed Crime News Today

आकाश सावंत, प्रतिनिधी 

Beed Crime News Today : बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजोबांनी नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या दोन्ही घटना ताज्या असताना आणखी एका घटनेमुळं संतापाची लाट पसरली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या भाच्याने मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले असताना संधी साधली.रात्री घरात एकट्या असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला.आरोपी मुलगा मामा घरी येण्याआधी घरातून पळून गेला. 

आरोपी भाच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

त्यानंतर आई वडील घरी आल्यानंतर पीडितीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन भाच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सदरील आरोपीस पोलिसांनी ईटकुर येथून अटक केलीये. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन या नराधमाने अल्पवयीन मुलीलावर लैंगिक अत्याचार केला.

Advertisement

नक्की वाचा >> IMD Alert: 'या' कालावधीत यलो अलर्ट,विजा कडाडताना मोबाईल वापरल्यास मृत्यू होतो का? हवामान विभागाची मोठी अपडेट

वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले

धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी केवळ एकदाच नाही तर मागील पाच महिन्यांपासून अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत होता.तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार,13 मार्च ते 19 मार्च 2026 या कालावधीत आणि त्याआधीही 2 ते 3 महिन्यांपासून त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले होते,अशीही माहिती समोर आली आहे. 

नक्की वाचा >> 8 महिन्यांची गर्भवती झाली TVK ची आमदार,प्रचार करताना झाली होती बेशुद्ध,वाचा पल्लवीची थक्क करणारी Success Story