मांडव सजला, वऱ्हाडी जमले; मात्र लग्नाआधी नवरीची पार्लरमध्ये गोळ्या झाडून हत्या  

UP Crime News : काजलचा मेकअप सुरु असतानाच बाहेरून एक तरुण तिला बोलावण्यासाठी आला. तोंडाला रुमाल बांधला होता. तो काजलला वारंवार बाहेर येण्यास सांगत होता. काजलने नकार दिल्याने त्याने अचानक दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तर प्रदेशातील झाशीमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही तास आधी मेकअप करण्यासाठी गेलेल्या नवरीची ब्युटी पार्लरमध्येच हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून तरुणारे नवरीवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार 22 वर्षीय काजल राजकुमार ही मध्य प्रदेशातील दतिया येथील रहिवासी होती. झाशीच्या सिमथरी गावातील रहिवासी असलेल्या राजसोबत कुटुंबीयांनी तिचे लग्न ठरले होते. काजल काही दिवसांपूर्वी दतियाहून कुटुंबासह झाशीला आली होती. झाशीतील निशा गार्डन या मॅरेज हॉलमध्ये लग्नसोहळा पार पडणार होता. पाहुण्यांची लगबग सुरु होती. काजल जवळच्या ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत तिची बहीण आणि दोन मैत्रिणीही होत्या.

(नक्की वाचा - कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डॉक्टरांकडून हलगर्जीपणा? पत्नीची तब्येत बिघडल्याने पतीची पोलिसांत धाव)

काजलचा मेकअप सुरु असतानाच बाहेरून एक तरुण तिला बोलावण्यासाठी आला. तोंडाला रुमाल बांधला होता. तो काजलला वारंवार बाहेर येण्यास सांगत होता. काजलने नकार दिल्याने त्याने अचानक दरवाजा तोडून आत प्रवेश केला. काजलची बहीण नेहाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण रागात माझी फसवणूक का केली, अशी विचारणा वारंवार करत होता. काजलला सोबत येण्यास तो सांगत होता. मात्र काजलने नकार दिल्याने त्याने तिच्या छातीत गोळी झाडली. गोळीबारानंतर काजल जमिनीवर कोसळली. 

(नक्की वाचा - 1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम)

काजलला कसंबसं तिथून तातडीने झाशी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबार करणारा हा वधूचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी काजलला आधीपासूनच ओळखत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तो देखील दतिया जिल्ह्यातील सोनागिरी पोलीस स्टेशन हद्दीतील त्याच गावचा रहिवासी आहे. दोघांमध्ये काय झाले आणि आरोपीने असे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article