Brother Killed Sister : तीन बेडरूम असलेल्या एका फ्लॅटसाठी एक भाऊ 'कसाई'बनला. त्याने आधी त्याच्या विधवा बहिणीशी वाद घातला. त्यानंतर चाकूने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह लपवण्यासाठी कैचीने मृत शरीराचे तुकडे केले. एक एक करून नराधम भावने त्याच्या बहिणीच्या मृतदेहाचे अनेक छोटे-छोटे तुकडे केले आणि त्यानंतर ते टॉयलेटच्या पॉटमध्ये फ्लश केले.शरीराचे जे अवयव मोठे होते,ज्यांना फ्लश केलं जाऊ शकत नव्हतं. शरीराच्या त्या तुकड्यांना त्याने एका प्लास्टिकच्या पिशवीत भरलं. मृतदेहाची पूर्णपणे विल्हेवाट लावण्याआधीच पोलीस त्याच्या घरी पोहोचले अन् आरोपीला अटक केली. ही धक्कादायक घटना रशियाच्या मॉस्कोत घडली.
ऑफिसच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं अन्..
ज्यावेळी पोलिसांनी दरवाजाची घंटी वाजवली, त्यावेळी आरोपी त्याच्या बहिणीच्या मृतदेहाचे इतर तुकडे टॉयलेटमध्ये फ्लश करण्याच्या तयारीत होता. पण दरवाजावर कोणीतरी आलं आहे, याची चुणूक त्याला लागली आणि तो घाबरला आणि गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि ते दरवाजा तोडून आत घुसले. पोलिसांसोबत ते सुद्धा लोक होते, जे त्याच्या बहिणीच्या कार्यालयात काम करायचे. हत्या झालेली महिला कार्यालयात आली नव्हती आणि तिने फोनही उचलत नाही. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं आणि ते तिच्या घरी आले.
नक्की वाचा >> महाल बुकींग आणि प्रायव्हेट जेटची चर्चा विसरा, पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात सियाने टाकला नवा डाव
आधी करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला
'द सन'च्या रिपोर्टनुसार,घरातील सीन एखाद्या हॉरर फिल्मसारखा होता. पोलिसांनी आरोपीला पुरावे नष्ट करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.पोलिसांनी घरातून ती प्लॅस्टिकची पिशवीही जप्त केली.या पिशवीत महिलेच्या शरीराचे तुकडे होते.पोलिसांनी शेजाऱ्यांशी जेव्हा विचारपूस केली, तेव्हा हत्या झालेल्या महिलेबाबत त्यांना माहिती मिळाली. स्लेवेंता असं त्या महिलेचं नाव होतं. पतीच्या मृत्यू झाल्यानंतर ती त्या घरात राहायची. पण बहिणीचं घरात राहणं आरोपी भाऊ दिमित्रीला पसंत नव्हतं. त्यामुळे त्याने त्याच्या बहिणीला करंट देऊन एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ती वाचली होती.
अडीच कोटींचा फ्लॅट बनला मृत्यूचं कारण
शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की,आरोपी त्याच्या बहिणीला त्रास द्यायचा. पण तरीही ती सर्वकाही सहन करून इथे राहायची.ती ज्या घरात राहायची तो तिच्या मृत आई वडिलांच्या नावावर होता. ज्याची किंमत 2.5 कोटी रुपये आहे.त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात ते घर दोन्ही मुलांच्या नावावर केलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world