Nagpur News : नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रॉपर्टीच्या वादातून एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरकडील नातेवाईकांनी क्रिकेट बॅट, लाकडी दांडके आणि पिकॅक्सने (टिकास) तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
संपत्तीतील हिश्श्यावरुन कुटुंबात वाद...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसीभाई ही ७५ वर्षांची असून तिला दोन मुली आणि तीन मुलं आहेत. तुलसीबाई नोकरीवर होती त्यामुळे तिला पेन्शन मिळतं. याशिवाय तिच्या नावावर एक घरही आहे. आईच्या पैशांच्या वादातून तीन मुली आणि दोन मुलांमध्ये भांडण होतं. तुलसीबाईंचा जावई त्यांच्या घरी गेला होता. यावेळी तुलसीबाईची मुलगी लक्ष्मी, तुलसीबाईचा मुलगा संतोष आणि नातू दीनानाथ हे तिघेही त्यावेळी घरात होते. त्यावेळी प्रॉपर्टीच्या वादात मारहाण झाली.
ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडुरंग नगरची आहे. मृत तरुणाची ओळख ३० वर्षीय अभिषेक गुड्डू धुर्वे अशी पटली आहे. पोलिसांच्या मते, अभिषेकचा विवाह तुळशीबाई गायगोवाल यांची मुलगी आंचल हिच्यासोबत झाला होता. तुळशीबाईंच्या संपत्तीतील हिस्स्यावरून कुटुंबात वाद सुरू होता. संपत्तीतील हिस्स्यावरून वाद वाढल्यानंतर तुलसीबाईंचा नातू दीनानाथ निर्मलकर (३२) याने क्रिकेट बॅटने अभिषेकवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलगा संतोष गायगोवाल (५०) आणि लक्ष्मी पटेल यांनीही लाकडी दांडके व पिकॅक्सने (टिकास) त्याच्यावर हल्ला केला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अखिलेशला त्याची पत्नी आधी मेयो रुग्णालयात आणि नंतर मेडिकल रुग्णालयात घेऊन गेली. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी दीनानाथ निर्मलकर आणि संतोष गायगोवाल यांना अटक केली असून, लक्ष्मी पटेलची अटक अद्याप बाकी आहे. या हल्ल्यात लक्ष्मीही जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world