जाहिरात

'Hello मी बँकेतून बोलतोय...' एक कॉल अन् भाजप आमदाराच्या खात्यातून लाखो रूपये फुर्रर्रर्र

भाजप आमदाराला सायबर गुन्हेगारांनी लाखोचा गंडा घातला आहे. त्यानंतर त्या भाजप आमदाराला पोलिसात धाव घ्यावी लागली आहे.

'Hello मी बँकेतून बोलतोय...' एक कॉल अन् भाजप आमदाराच्या खात्यातून लाखो रूपये फुर्रर्रर्र
बुलंदशहर:

डिजिटल बँकींगमुळे आर्थिक व्यवहारकरणं नक्कीच सोपं झालं आहे. पण असं असलं तरी त्यामुळे अनेक अडचणीही निर्माण होत आहे. अनेकांना सायबर फ्रॉडचा फटका ही बसत आहे. तर अनेकांना ऑनलाईन गंडवलंही जात आहे. याचा फटका मग सर्व सामान्य व्यक्ती असो, की मोठा अधिकारी. येवढेच काय तर राजकीय नेत्यांनाही त्याचा फटका बसला आहे. असचं एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. त्यात एका भाजप आमदाराला सायबर गुन्हेगारांनी लाखोचा गंडा घातला आहे. त्यानंतर त्या भाजप आमदाराला पोलिसात धाव घ्यावी लागली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात. बुलंदशहरचे प्रदीप चौधरी हे आमदार आहेत. ते भाजपकडून आमदार झाले आहेत. चौधरी यांना एक फोन कॉल आला होता. त्यावरून आपण बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे सांगण्यात आले. ते त्यांच्या बरोबर फोनवर बोलत होते. फोनवर बोलत असतानाच त्यांच्या क्रेडिट कार्ड अकाऊंट मधून 2 लाख 65 हजार गायब करण्यात आले. आमदार साहेबांना पैसे गुल झाले हे समजलेच नाही.  

ट्रेंडिंग बातमी -  अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक

विशेष म्हणजे हे करत असताना सायबर चोरांनी ओटीपी शिवाय त्यांचे पैसे त्यांच्या खात्यातून उडवले. असा प्रकारात अनेक वेळा ओटीपीची मदत घेतली जाते.पण या प्रकरणात तसे झाले नाही. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहे. या प्रकरणी आता आमदार प्रदीप चौधरी यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास आता पोलिस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
ग्राहकांच्या 'त्या' यादीवरुन वाधवान यांची IBBI कडे धाव; ग्राहकांनी मात्र फेटाळले सर्व दावे
'Hello मी बँकेतून बोलतोय...' एक कॉल अन् भाजप आमदाराच्या खात्यातून लाखो रूपये फुर्रर्रर्र
Citizens protest in the case of sexual abuse of school children in Badlapur
Next Article
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं