जाहिरात

Shocking news: सुंदर तरुणीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट अन् 2.5 कोटी फुर्रर्रर्र! पण त्या पुढे तर कहरच झाला

पुढे 14 जून ते 9 डिसेंबर दरम्यान राहुल यांनी त्या महिलेने सांगितलेल्या विविध खात्यांत 2.50 कोटी रुपये जमा केले.

Shocking news: सुंदर तरुणीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट अन् 2.5 कोटी फुर्रर्रर्र! पण त्या पुढे तर कहरच झाला
  • कानपूरमधील एका बड्या व्यापाऱ्याला फेसबुकवर अनोळखी महिलेने फसवणूक केली.
  • या सायबर ठगांनी व्यापाऱ्याला गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोन कोटी पन्नास लाख रुपयांची फसवणूक केली
  • पैसे मागितल्यावर व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या टोळीने दिली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. सायबर फ्रॉडचे हे प्रकार चकीत करणारेच आहेत. अनेक वेळा याबाबत सरकार पोलीस यांच्याकडून सावध करूनही अनेक जण या सायबर ठगांच्या आमिषाला फसतात अन् लाखो करोडो रूपये गमावून बसतात. शेवटी आपण फसवलो गेलो आहे असं समजल्यानंतर ते पोलीसांच्या आश्रयाला जातात. असचं एक पोलीसांनाही चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात तर तब्बल दिड कोटी रूपयांना चुना लागला आहे. या प्रकरणाचा शोध करत असताना तर या सायबर ठगांच्या आयडीया पाहून पोलीसही चक्रावून गेला आहे.  

एका अनोळखी महिलेची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे कानपूरमधील एका बड्या व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. ही महिला दिसायला सुंदर होती. त्यामुळे या व्यापाऱ्याने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर सायबर भामट्यांनी या व्यापाऱ्याला गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 2.50 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, पैसे परत मागितले असता व्यापाऱ्याच्या पत्नी आणि मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही या टोळीने दिली. या धमकीने आपण फसवलो गेलो आहे हे व्यापाऱ्याच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.   

नक्की वाचा - Chandrapur News: भाजप शहराध्यक्षांची भलतीच डेअरिंग, परस्पर उमेदवारांची यादीच बदलली, पुढे जे घडलं ते...

त्याचं झालं असं की उत्तर प्रदेशातील  चकेरी येथील राहुल केशरवानी यांना मे 2025 मध्ये एका महिलेची फ्रेंड  रिक्वेस्ट फेसबुकवर आली होती. ती महिला आकर्षक होती. त्यामुळे त्यांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यांच्या बोलणे सुरू झाले. फेसबुकची मैत्री पुढे  व्हॉट्सॲप चॅटिंग पर्यंत गेली. दोघे ही व्हॉट्सअपवर चॅट करू लागले. तिने राहुल यांचा विश्वास जिंकला. याच जोरावर तिने राहुल यांना एका बनावट वेबसाइटवर ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त केले. शिवाय त्यात मोठा फायदा आहे याचं आमिष ही दाखवले. ही योजना राहुल यांना ही पटली. मोठा फायदा होणार हे त्यांना भावलं. तिथेच ते बळी पडले.

नक्की वाचा - Akola News: पैसे घेवून तिकीट विक्री! व्हायरल व्हिडीओने एकच खळबळ, भाजप-काँग्रेस-एमआयएममध्ये असंतोष उफाळला

 पुढे 14 जून ते 9 डिसेंबर दरम्यान राहुल यांनी त्या महिलेने सांगितलेल्या विविध खात्यांत 2.50 कोटी रुपये जमा केले.पण त्यांना पैसे भरल्यानंतर ही फायद्याची रक्कम काही मिळत नव्हती. शिवाय दिलेले  पैसे ही मिळत नव्हते. याबाबत त्यांनी विचारणा केली. पण त्यांना उडवा उडवीची उत्तर मिळाली. शिवाय त्यांना ठार मारण्याची ही धमकी देण्यात आली. शिवाय अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी तातडीने या प्रकरणी पोलीसात तक्रार दिली. पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून, त्यांनी लुटलेले पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ओसामा, मोहम्मद आरिफ यांच्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडे 1.50 कोटी रुपयांच्या 'यूएसडीटी' क्रिप्टो गुंतवणुकीचे पुरावे सापडले आहेत. या टोळीचे जाळे तेलंगणा, गुजरात आणि राजस्थानपर्यंत पसरलेले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com