Buldhana Crime: आई-वडील कामाला गेले, मुलीने दरवाजा बंद केला अन्... प्रेमप्रकरणातून भयंकर घडलं

तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाचे नाव तन्मय विजय गवई राहणार पाटोदा  चिखली असे आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा:

Buldhana Crime:  लग्नाचे खोटे आमिष दाखवून प्रेमात फसवणूक झाल्याच्या तणावातून 20 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली आहे.  चिखली तालुक्यातील केळवद गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रूपाली रामदास सरकटे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाचे नाव तन्मय विजय गवई राहणार पाटोदा  चिखली असे आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

लग्नाचे आमिष.. तरुणीची फसवणूक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृत तरुणी रुपालीचे तन्मय विजय गवळी याच्यासोबत दोन वर्षांपासून  प्रेम संबंध होते. तन्मय हा महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदावर पुणे येथे नोकरीवर होता. तन्मयने रूपालीला प्रेमाच्या जाळ्यात ओढताना सतत संपर्कात राहावी म्हणून मोबाईल सुद्धा घेऊन दिला होता. याच मोबाईल वरून प्रेमाच्या गोष्टी आणि आयुष्याचे स्वप्न रंगवले जात होते. दोघांच्या अनेकदा भेटीही झाल्या. 

Pune News: निवडून येताच भाजपच्या नगरसेवकांचा राडा, नगरसेविकेच्या भावावर हल्ला! प्रकरणाला वेगळचं वळण

आपण उन्हाळ्यात लग्न करू असे खोटे आमिष त्याने रूपालीला दिले होते. मात्र 24 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता रूपाली तन्मयसोबत मोबाईलवर फोनवर अखेरची बोलली. यावेळी दोघांमध्ये लग्नावरुन वाद झाल्याचे बोलले जात आहे.  या फोननंतर रुपाली तणावात होती. तिचे आईवडील कामावर गेले होते तर तिचा भाऊ गौरव बुलढाणा येथे कामानिमित्त घराबाहेर पडला होता.

तरुणीने आयुष्य संपवलं

घरात कोणी नसताना रूपालीने आतून दरवाजा बंद करून घेतला आणि घरातीलच असलेल्या खिडकीच्या एका पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. रुपाली घराचा दरवाजा उघडत नसल्याने तिच्या वडिलांना लवकर घरी या असे सांगण्यात आले. रूपालीचे आई-वडील घराकडे धावले. दोघांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

Malad Crime: मुंबईत चाललंय काय? लोकलमध्ये प्राध्यापकाला संपवलं; ट्रेनमधून उतरताना वाद अन्...

समोरील दरवाजा उघडत नसल्याने मागील दरवाजा उघडताच रूपाली गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आली आणि ह्या वेळेस आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तन्मय मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे केळवद गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Topics mentioned in this article