Buldhana Crime: महाराष्ट्राच चाललंय काय? गरोदर महिलेला लाथा बुक्क्यांनी मारलं, बाळाचा मृत्यू

योग्य उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. गावंडे कुटुंबाच्या मारहाणीतून आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ही जीवघेणी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बुलढाणा:  भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून गरोदर महिलेसह कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत गरोदर असलेल्या महिलेच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुलढाण्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार,  बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सम्राट चौकात भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणात गंभीर घटना घडली आहे. विजय गावंडे, त्यांचा मुलगा गौरव गावंडे तसेच पत्नी आणि मुलगी यांनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे कपडे फाडण्यात आले, तर दोन महिन्याच्या गरोदर महिलेला पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

Thane News : 'PUBG' वादातून झालेल्या हत्या प्रकरणी तीन तरुणांची निर्दोष मुक्तता, काय आहे कारण?

या प्रकाराची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. मात्र पोलिसांनी तक्रारदारांना तब्बल तीन तास बसवून ठेवले, असे आरोप फिर्यादीच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर गरोदर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. 

दुसरीकडे गावंडे कुटुंबाच्या मारहाणीतून आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ही जीवघेणी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता फिर्यादी भोजने कुटुंबीयांकडून होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )