जाहिरात

Thane News : 'PUBG' वादातून झालेल्या हत्या प्रकरणी तीन तरुणांची निर्दोष मुक्तता, काय आहे कारण?

 Thane News : ऑनलाइन गेम PUBG मुळे झालेल्या किरकोळ वादामुळे ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

Thane News : 'PUBG' वादातून झालेल्या हत्या प्रकरणी तीन तरुणांची निर्दोष मुक्तता, काय आहे कारण?
प्रतिकात्मक फोटो
ठाणे:

Thane PUBG Murder: ऑनलाइन गेम PUBG मुळे झालेल्या किरकोळ वादामुळे ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील तिन्ही आरोपींची  ठाणे जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पोलिसांनी आणि फिर्यादी पक्षाने सादर केलेले पुरावे 'अपुरे आणि अविश्वसनीय' ठरल्याने, साहिल जाधव हत्या प्रकरणी न्यायमूर्तींनी तिघांनाही क्लीनचिट दिली.

नेमके काय झाले?

28 फेब्रुवारी 2022 रोजी वर्तकनगर, जानकीदेवी चाळीजवळ साहिल बबन जाधव याचा तलवारी, चाकू आणि स्टील रॉडने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमागे 31 डिसेंबर 2021 रोजी साहिल आणि तिन्ही आरोपी (प्रणव माळी, रोनित गायकवाड आणि संदेश डेरे) यांच्यात PUBG खेळण्यावरून झालेला वाद होता, असा पोलिसांचा दावा होता.  साहिलच्या आईने तेव्हा फक्त साध्या मारहाणीची तक्रार दिली होती.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )
 

न्यायालयाने काय म्हटले?

पीठासीन न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी पुराव्याची चिरफाड केली. साहिलची आई कमल जाधव यांनी 10-12 हल्लेखोर पाहिले, पण त्यांना केवळ 2-3 जणच ओळखता आले. विशेष म्हणजे, बहुतेक साक्षीदारांनी घटनेच्या सात दिवसांनंतर आपले जबाब दिले, ज्यामुळे त्यांच्या आठवणींच्या अचूकतेबद्दल आणि विश्वसनीयतेबद्दल शंका निर्माण झाली.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील उच्चशिक्षित IT इंजिनियर, बँक कर्मचारी दहशतवादी गटात सहभागी! ATS नं उधळला मोठा कट )

साहीलच्या आईने सांगितलेला घटनाक्रम पोलिसांच्या कथेशी जुळला नाही. आरोपींनी दाखवलेली शस्त्रे सार्वजनिक ठिकाणांहून जप्त झाली, तसेच जप्त केलेल्या कपड्यांवरील रक्तगट विश्लेषणही अपयशी ठरले. या तकलादू पुराव्यामुळे, आरोपींना हत्येसाठी दोषी धरता येत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तिन्ही तरुणांना दिलासा दिला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com