Buldhana news : बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या मुलीला भीषण रक्तस्त्राव; परप्रांतीय मजुराचं घृणास्पद कृत्य उघड

आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana news : बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले. मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कंत्राट 'सॅम इंडिया' या कंपनीकडे असून, येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत.

रक्तस्त्राव न थांबल्याने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल...

२८ जानेवारी रोजी दुपारी परिसरात एकटी असलेल्या मुलीला झारखंड राज्यातील पलामू येथील 25 वर्षीय आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया याने फूस लावून जवळील झोपडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या घटनेनंतर आरोपीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. दरम्यान, संध्याकाळी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पीडित मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेलं. मात्र रक्तस्राव न थांबल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 

नक्की वाचा - Sangli Crime: बाप-लेकावर हल्ला, मुलाच्या डोळ्यादेखत पित्याला संपवलं, कुठे घडली भयंकर घटना?
 

रात्री पीडित मुलगी ताब्यात...

तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यात सतर्कता अलर्ट जारी केला. बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Topics mentioned in this article