शरद सातपुते, सांगली:
Sangli Crime: गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये हत्या, मारामारीच्या गंभीर गुन्ह्यांचे सत्र सुरु आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या खूनांच्या घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचे भय आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच आता आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून बाप लेकावर हल्ला करत मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांना संपवल्याची धक्कादायक घडना सांगली शहरात घडली आहे.
बाप- लेकावर हल्ला...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीमध्ये खुनांची मालिका सुरुच आहे. सांगली शहरातील इनाम धामणी रोडवर एका बाप-लेकावर हल्ला करत मुलाच्या सामोरंचं बापाला दगडाने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कीर्ती कुमार शेडबाळे (वय,50) असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हल्ल्यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.किर्तीकुमार शेडबाळे,हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणीजवळ असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात असताना,रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघा संशयित हल्लेखोरांच्या बरोबर वादावादीचे प्रकार घडला.
मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू
यानंतर हल्लेखोरांनी कीर्ती कुमार शेडबाळे व त्यांच्या मुलावर हल्ला चढवला,ज्यामध्ये कीर्तीकुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले आहे.या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन खून झाला,हे स्पष्ट होऊ शकला नाही. मुलांच्या डोळ्यादेखत बापाची निर्घृपणे हत्या झाल्याच्या या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Shocking News : IT रेड सुरु असतानाच बड्या उद्योगपतीची आत्महत्या, चौकशीत नेमकं काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world