राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik Ashok Murtadak Gold Fraud Case : नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घरातील सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका सराफ व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,संशयित योगेश बाळकृष्ण दाभाडे हा सराफ व्यावसायिक असून,गेल्या दोन वर्षांत त्याने मुर्तडक कुटुंबाशी जवळीक निर्माण केली.घरातील महिलांचा विश्वास संपादन करत त्याने दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले.
पत्नीकडे 100, मुलीकडे 50 आणि सुनेकडे 50 तोळे सोने होते
मुर्तडक यांच्या पत्नीकडे 100 तोळे,मुलीकडे 50 तोळे आणि सुनेकडे 50 तोळे असे एकूण 200 तोळे सोन्याचे दागिने असल्याची माहिती आहे. आरोपीने कुटुंबीयांना हे सोने दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दीड वर्ष उलटल्यानंतरही ना मूळ सोनं परत मिळालं,ना दुप्पटीने सोनं मिळालं.
नक्की वाचा >> Pune News: पुरंदरच्या जेजुरीत मन सुन्न करणारी घटना! सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसताच अख्ख कुटुंब हादरलं
सोनं ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने अनेक महिने कोणतीही हालचाल केली नाही.महिलांनी हा प्रकार अशोक मुर्तडक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संशयिताकडे मूळ सोने परत मागितले.मात्र,विविध कारणे सांगत संशयिताने वेळकाढूपणा केल्याचा आरोप आहे.दीड वर्ष उलटूनही सोने परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर अखेर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, तिघांना अटक, 500 रुपयांच्या किती नोटा सापडल्या?
दागिने दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं आणि..
दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडल्यास किती मोठे नुकसान होऊ शकते,याचं हे ताजं उदाहरण आहे.या प्रकरणात आता पोलिसांकडून आर्थिक व्यवहार,सोन्याचा मागोवा आणि संशयिताची भूमिका याचा सखोल तपास केला जात आहे.या तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का,याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.