जाहिरात

Pune News : आधी दहशत पसरवली, नंतर चितळे बंधूंच्या दुकानात शिरला; CCTV फुटेजमुळे पुण्यातील सराईत घरफोड्या अटकेत

रात्री अडीचच्या सुमारास आंबेगाव येथील चितळे बंधूंच्या दुकानात चोरी झाली होती. यामध्ये एक अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. 

Pune News : आधी दहशत पसरवली, नंतर चितळे बंधूंच्या दुकानात शिरला; CCTV फुटेजमुळे पुण्यातील सराईत घरफोड्या अटकेत

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी कोयता गँगने पुण्यात दहशत माजवली होती. ही कोयता गँग लोकांना धमकावणे आणि रस्त्यांवरील गाडी फोडणे सारखे गुन्हे करीत होते. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील नामांकित चितळे बंधूंच्या दुकानात चोरीची घटना समोर आली होती. रात्री अडीचच्या सुमारास आंबेगाव येथील चितळे बंधूंच्या दुकानात चोरी झाली होती. यामध्ये एक अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. 

सीसीटीव्हीमध्ये चोरी कैद

२५ जानेवारीच्या मध्यरात्री २.५० च्या सुमारात चितळेंच्या दुकानात चोरी झाली होती.  या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईच्या दुकानात झालेल्या चोरीचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला असून, या प्रकरणातील चोर हे घरफोडीचे अनेक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. चितळे बंधू यांच्या दुकानात रात्री २.५० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली. सुरुवातीला आरोपी सीसीटीव्ही काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसतं. मात्र त्यांना ते शक्य होत नाही. यानंतर ते दुकानात शिरतात. याच फुटेजच्या आधारे आंबेगाव पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. 

नक्की वाचा - Lonavala News : ...तर पोलिसांची कारवाई निश्चित; कार अन् बुलेट घेऊन लोणावळ्यात येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

अल्पवयीन आरोपीही ताब्यात...


सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत आरोपी हा घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून आंबेगाव पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत आरोपी ओंकार मारुती देढे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास आंबेगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com