Nashik News: 'हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर 7 लाख द्या..', ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची धमकी

तिच्या पतीवर, एका बार आणि रेस्टॉरंटच्या मालकाला व्यवसायात अडथळा निर्माण करत सात लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नाशिक: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर खंडणी प्रकरण उघडकीस आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या  एका महिला पदाधिकाऱ्यांवर आणि तिच्या पतीवर, एका बार आणि रेस्टॉरंटच्या मालकाला व्यवसायात अडथळा निर्माण करत सात लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरातील ‘रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार' चालवणाऱ्या आशुतोष कृष्णा गडलिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ते १४ जुलै दरम्यान, श्रृती यतिन नाईक आणि परिसरातील काही महिला या आंदोलनाला बसले होते. या आंदोलन अनोखे असल्याने  या आंदोलनाने सर्वांची लक्ष वेधले होते.

Viral video: सरळ धरलं थेट आपटलं! कणकवली रेल्वे स्थानकात WWE स्टाईल राडा

दिवसभर भजन करण्याचे  आंदोलनाचे स्वरूप होते  त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी  हॉटेलमुळे आम्हाला त्रास होतो," असं कारण पुढे करत त्यांनी ग्राहकांना त्रास दिला, वेटरला अडवलं, हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर ७ लाख रुपये द्या, नाहीतर हॉटेल बंद करू  धमकी दिल्याचे बार मालकाने सांगितले  बार मालकाने तातडीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठलं.

पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. खंडणीसारख्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. घटनेची सत्यता काय, हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल. मात्र, राजकीय ओळख असो की सामान्य नागरिक  कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचं पुन्हा एकदा या प्रकरणातून अधोरेखित झालं आहे.

Advertisement
Topics mentioned in this article