
कोकणातून मुंबईला येताना सर्वच रेल्वे गाड्या या हाऊस फूल असतात. अनेक वेळा रेल्वेचे तिकीटही मिळत नाहीत. ऐन वेळी जनरलचं तिकीटी घेवून कोकणातून मुंबई गाठावी लागते. अशा वेळी ट्रेन येण्याच्या काही वेळ आधीच तिकीट काऊंटर सुरू होते. त्यामुळे त्यावर गर्दी ही मोठ्या प्रमाणात होते. त्यातून वादही होताना दिसतात. हे काही नवीन नाही. आता तसाच एक प्रकार कणकवली रेल्वे स्थानकात घडला आहे. त्यात व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
तुम्ही WWE ची कुस्ती पाहीलं असाल. त्याचीच झलक कणकवली रेल्वे स्थानकात पाहायला मिळाली. एकाने दुसऱ्या व्यक्तीचा गळा धरला. आणि त्याला काही समजण्याच्या आतच उलटा आपटला. अगदी WWE मध्ये आपटतात तसाच. हे सर्व कणकवली रेल्वे स्थानकात घडत होते. तिथं उपस्थित असलेले लोक हे सर्व पहात होते. तर काही जण या हाणामारीचा व्हिडीओ काढण्यात मग्न होते. त्यांच्यातल्याच एकाने काढलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
कणकवली स्थानकात तुतारी एक्सप्रेस येणार होती. त्यामुळे या ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी भली मोठी रांग लागली होती. त्याच वेळी या रांगेत मध्येच घुसण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. त्याचा राग दुसऱ्या तरुणाला आला. त्याने त्यास हटकले. दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. मग काय दुसऱ्याने कसलाही विचार नकरता रांगेत घुसणाऱ्या तरुणाला तिथल्या तिथं आडवं केलं. उभं उचलून खाली दणकन आपटलं. त्यामुळे तो तरुण हादरला.
स्वत:ला सावरत तो तरुण उठला. त्यानंतर त्याने ज्याने त्याला आपटलं होतं, त्याच्या मागे तो लागला. दोघांमध्ये पुन्हा हमरीतुमरी झाली. पण रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे त्यांची भांडणं सोडवण्या पेक्षा तिकीट कसं मिळेल यावर सर्वांचे लक्ष होतं. ही हाणामारी पुढे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी पाहीली. त्यानी तिथे धाव घेत त्यांचे भांडण सोडवलं. तो पर्यंत त्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world