ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सगळ्या व्याधी दूर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा, असे म्हणत हातामध्ये बायबल ठेवून जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितल्याने पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी चंदननगरमधील विडी कामगार वसाहत परिसरात ही घटना घडली. तक्रारदार खासगी कंपनीत नोकरीला असून तिची आई, भावासह चंदननगर भागात वास्तव्यास आहे.
या प्रकरणात रिना रामदास मनसा, एलिसा रमेश आल्प्रेड, रिबेका अनुराज सिगामनी, शारदा गजानन सोदे, रिया राजू सिंगामनी अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रिना मनसा आणि एलिसा आल्प्रेड या तक्रारदार महिलेच्या घरी आल्या होत्या. तक्रारदार महिलेच्या दारात उभं राहून त्यांनी ख्रिचन धर्माबद्दल माहिती सांगून एक पत्रक दिलं. या पत्रकावरील स्कॅनर स्कॅन केल्यास ख्रिश्चन धर्माबद्दल आणखी माहिती मिळेल, असंही सांगण्यात आले.
नक्की वाचा - किळसवाणा प्रकार, ऑनलाइन आईस्क्रिम अन् कोनमध्ये माणसाचं तुटलेलं बोट; महिलेला बसला धक्का!
त्यानंतर दोघींनी जबरदस्तीने घरामध्ये प्रवेश केला. यावेळी इतर तीन महिला घराबाहेर थांबलेल्या होत्या. रिना आणि एलिसा यांनी ख्रिश्चन धर्माबद्दल माहिती सांगून हातामध्ये बायबल ठेवले. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा, असे म्हणत हातामध्ये बायबल ठेवून जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितल्याने 25 वर्षीय तरुणीने त्या पाचही महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.