Pune News : औरंगजेब कबर...धार्मिक तेढ अन् सोशल मीडिया; पुण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल

औरंगजेबावरुन महाराष्ट्रातील वातावरण अधिक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Controversy over Aurangzeb : सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद निर्माण झाला आहे. नागपुरमध्ये झालेली दंगल हे त्याचच उदाहरण आहे. दरम्यान औरंगजेब प्रकरण शांत होत असल्याचं दिसत नाही. पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आरोप केला जात आहे. औरंगजेबाचा फोटो आणि रील्स प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे औरंगजेबावरुन महाराष्ट्रातील वातावरण अधिक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा येथील एका व्यक्तीवर सोशल मीडिया पोस्टद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. इन्स्टाग्राम आयडीवर औरंगजेब यांच्या संबंधित इन्स्टाग्रामवर तीन रील्स तयार करण्यात आले. या रील्समध्ये आक्षेपार्ह आणि मानहानीकारक मजकूर होता. ज्यामध्ये थोर व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे.  आरोपीने समाजामध्ये धार्मिक तणाव आणि दुही निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकले आणि त्यासोबत अनुचित चॅटिंगही केल्याचं प्रथमदर्शनी समजतंय. ही घटना 21 मार्च 2025 रोजी उघडकीस आली आणि 22 मार्च 2025 रोजी 12.56 वाजता गुन्हा अधिकृतपणे नोंदवण्यात आला. बशीद शेख असं आरोपीचं नाव आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी,  कब्रस्तानात सुपुर्द-ए-खाकवेळी काय घडलं?

तर दुसऱ्या प्रकरणात पुण्यात औरंगजेबाचे फोटो, रिल्स ठेवल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील विविध भागात सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी  तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशन हद्दीत, चमनशहा दर्गा परिसरात काही व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त कॅप्शनसह औरंगजेबाचे फोटो पोस्ट केले. या पोस्टद्वारे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आहे. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत गायकवाड (वय 24) यांनी तक्रार दाखल केली होती. या पोस्टमध्ये सहभागी असलेल्या तीन इन्स्टाग्राम आयडी धारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये इरफान खान, शेख अर्ब या दोघांचा समावेश आहे. 

Advertisement

तिसऱ्या प्रकरणात बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने विशिष्ट व्यक्तीचे फोटो आणि गाणे इन्स्टाग्रामवर लावून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आणि हिंदू-मुस्लीम धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. या प्रकरणात विक्रम प्रेमचंद सोहेल शेख (वय 35, रा. ताडीवाला रोड, कृष्णा हट्टी चौक, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement