जाहिरात

Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी,  कब्रस्तानात सुपुर्द-ए-खाकवेळी काय घडलं?

अन्सारी यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. गर्दीचं चित्रिकरणादरम्यान नेमकं काय घडलं?

Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी,  कब्रस्तानात सुपुर्द-ए-खाकवेळी काय घडलं?

Nagpur violence : औरंगजेबाच्या थडक्यावरुन महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यादरम्यान नागपुरातील हिंसाचाराने चिंता निर्माण केली आहे. हे वारं महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पसरू नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. दरम्यान नागपूर हिंसाचारात एकाचा हकनाक बळी गेल्याचं समोर आलं आहे. नागपुरातील इनफान अन्सारी त्या दिवशी रात्री प्रवासाला निघाले होते. या हिंसाचारादरम्यान ते गंभीर जखमी झाले. यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी जमा झाल्याचं सांगितलं जात आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूरच्या हिंसाचारात गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचे काल शनिवारी निधन झाले. अंतिम संस्काराच्या वेळी व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याना उपस्थितांनी चित्रीकरण बंद करण्यास भाग पाडले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले.

Nagpur Violence : नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन? 'त्या' फेसबुक अकाऊंटवरुन खुलासा

नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन? 'त्या' फेसबुक अकाऊंटवरुन खुलासा

सोमवारी रात्री प्रवासाला निघालेले इरफान अन्सारी नागपूरच्या हिंसाचारात सापडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. काल त्यांचे रुग्णालयात निधन झाले. या घटनेमुळे त्या परिसरात तणावाचे वातावरण होते.  काल रात्री पोलीस बंदोबस्तात ताजनगर येथील कब्रस्तानात सुपुर्द ए खाक करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दीचे चित्रीकरण करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणांना काही लोकांनी हटकले आणि चित्रीकरण बंद करण्यास भाग पाडले. तणाव वाढू नये हे लक्षात घेता व्हिडिओग्राफर्सना चित्रीकरण बंद करावे लागले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: