Nashik CBI Raid : प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोड, 71 मोबाइलसह कोट्यवधींची रोकड जप्त

CBI च्या धाडीमध्ये घटनास्थळावरुन 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

Nashik Crime News : इगतपुरीतील प्रसिद्ध रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये CBI ने बेकायदेशीर (CBI raids Rain Forest Resort in Igatpuri) कॉल सेंटर उद्ध्वस्त केल्याचं उघडकीस आलं आहे. CBI कडून रिसॉर्टमालकासह, रिसोर्टच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीस सुरूवात झाली आहे. मुंबईतील BKC च्या CBI कार्यालयात जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. शेती संबंधित व्यवसायासाठी रिसॉर्टच्या 4 रूम बुक करण्यात आल्या होत्या अशी सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवलं जात होतं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये विविध मार्गातून फसवणुकीचे कॉल केले जात होते. गिफ्ट गार्ड, क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली परदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. यासाठी तब्बल 60 जणांची कॉलिंगसाठी नेमणूक करण्यात आली होती. ही 60 जणं बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवत होते. 

Advertisement

नक्की वाचा - Vasai Crime : 3 महिन्यात 200 पुरुषांनी शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था

CBI च्या धाडीमध्ये घटनास्थळावरुन 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय असून बँक अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील 5 आरोपींना CBI कडून अटक करण्यात आली असून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. 

Advertisement