जाहिरात

NEET मध्ये 99.99%, MBBS साठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या काही तासांपूर्वी विद्यार्थ्याची आत्महत्या

Chandrapur News : MBBS साठी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी त्याने टोकाचं पाऊल उचललं. यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.

NEET मध्ये 99.99%, MBBS साठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या काही तासांपूर्वी विद्यार्थ्याची आत्महत्या

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

Chandrapur News : NEET परीक्षेत यश मिळावं ही कित्येकांची इच्छा असतो. डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारे दिवस-रात्र अभ्यास करून नीटची परीक्षा देतात. पुढील पाच वर्षे खडतर मेहनत करतात. चंद्रपुरातून मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अनुराग अनिल बोरकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. अनुराग नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तरीही त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. (shocking step before enrolling in college for MBBS)

अनुरागसोबत नेमकं काय घडलं? 

19 वर्षीय अनुराग बोरकर याने नीट परीक्षेत यश मिळवलं होतं. मात्र त्याला डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे घडली. अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने सुसाइड नोटमध्ये डॉक्टर व्हायचं नसल्याचं सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला होता. तो आज एमबीबीएस प्रवेशासाठी जाणार होता. त्यापूर्वीच त्याने आपलं जीवन संपवलं. मृतक अनुराग बोरकर याने NEET UG 2025 परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होत. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले.  त्याला आज, 24 सप्टेंबरला एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतू त्यापूर्वी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे.

Pune News : अमित शाहांसोबत कॉन्फरन्स कॉल, रॉचं मिशन; निवृत्त अधिकाऱ्याचे 4 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?

नक्की वाचा - Pune News : अमित शाहांसोबत कॉन्फरन्स कॉल, रॉचं मिशन; निवृत्त अधिकाऱ्याचे 4 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?

परदेशात जायचं होतं पण...

अनुरागचे अनेक मित्र परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार होते. मात्र अनुरागचा नंबर भारतातील सरकारी रुग्णालयात लागल्याने कुटुंबाकडून येथेच मेडिकल शिक्षण घेण्यास सांगितलं जात होतं. मात्र अनुरागला परदेशात जाऊन मेडिकलचं शिक्षण घ्यायचं होतं. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com