अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chandrapur Crime News : वडिलांच्या बदलीसाठी आईचे दागिने तीन लाख रुपयांना विकले.ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी गेलेल्या तरुणाकडून ते पैसे हरवले.त्याने याबाबत घरच्यांना सांगितलं नाही.प्रथम प्रभाकर दडमल (24) असं या तरुणाचं नाव असून त्याने हे पैसे परत मिळवण्यासाठी मोठं कांड केलं.प्रथमने पैसे भरून काढण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने फक्त 24 तासांमध्ये उमरेड येथून आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून 57 हजारांची रक्कम जप्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार,प्रथम प्रभाकर दडमल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.चंद्रपूर येथील टाटा शोरूममधील गोदरेज डिजिटल लॉकरचा युनिक कोड वापरून 1 लाख 8 हजार रुपयांची रोकड चोरी करण्यात आली.लॉकरची कोणतीही तोडफोड न करता चोरी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील अनेक नागरिक गरवारे पुलाखाली उतरले, त्याचवेळी मुठा नदीला आला पूर, पुढे असं काही घडलं..
सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद वाहनामुळे आरोपी सापडला
सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद वाहनाच्या आधारे पोलिसांनी प्रथम दडमलपर्यंत धागेदोरे पोहोचवले.चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीचे वडील नागपूर येथील निबंधक कार्यालयात कार्यरत आहेत.त्यांच्या बदलीसाठी आईचे दागिने विकून तीन लाख रुपये जमा करण्यात आले होते.हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी प्रथमकडे देण्यात आले होते.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' सोसायटीतील नागरिक भयभीत, एकाच रात्री 5 फ्लॅटमध्ये झाल्या घरफोड्या, लाखोंचा माल लंपास
मात्र,ते पैसे त्याच्याकडून हरवल्यानंतर घरच्यांच्या भीतीने त्याने ही बाब लपवली.पैसे परत मिळवण्यासाठी त्याने पूर्वीच्या नोकरीदरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीचा वापर करून शोरूममधील डिजिटल लॉक उघडत चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world