Chandrapur news: 53 वर्षांची महिला, तो अल्पवयीन, मध्यरात्री घरात घुसला अन् खेळ खल्लास, कारण समोर येताच...

पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. शिवाय तपासही सुरू केला.

जाहिरात
Read Time: 3 mins
चंद्रपूर:

अभिषेक भटपल्लीवार

एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे टोकाचं पाऊल त्याने का उचललं हे समोर आल्यानंतर तर सर्वच जण हादरून गेले आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे पाच दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याची सुरूवात एका सिगरेटमुळे झाली, आणि त्याचा शेवट एका खूनात झाला. या मागे घडलेल्या सर्व घडामोडी या धक्कादायकच म्हणाव्या लागतील. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कविता रायपूरे याचे चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरातील रमाई नगर परिसरा किराणामालाचे दुकान आहे. त्याचे वय जळपास 53 वर्षे आहे. त्याच हे दुकान चालवतात. त्या दुकानात असताना एक अल्पवयीन तरूण तिथे आला. त्याने त्याच्याकडे सिगारेटची मागणी केली. त्यानुसार कविता यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. पण आपल्याकडे पैसे नाहीत असं त्या अल्पवयीन तरुणाने सांगितलं. आपल्याला उधार सिगारेट द्या असं तो म्हणाला. पण कविता यांनी त्याला उधार सिगारेट देण्यास नकार दिला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Abu Azmi: 'वारीमुळे रस्ता जाम होतो, पण नमाज...' अबू आझमींच्या वक्तव्याने वाद पेटणार?

सिगारेट उधार देण्यास नकार दिल्याने त्या अल्पवयीन तरुणाची सटकली. आपला अपमान झाला आहे अस त्याला वाटलं. हाच राग त्याने मनात धराला. काही करून या अपमानाचा बदला घ्यायाचा यासाठी तो पेटून उठला होता. त्याच दिवशी रात्री 12 ते 1 च्या सुमारास कविता याच्या घरात कोणी नसल्याचं त्याने पाहून घेतलं. त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी  मारत घरात शिरला. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने कविता यांच्यावर वार केले. या हल्ल्यात कविता या जागीच ठार झाल्या. त्यानंतर तो तरूण तिथून फरार झाला. 

Advertisement

ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...

पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. शिवाय तपासही सुरू केला. सुरूवातीला पोलिसांच्या हाती फार काही लागलं नाही. त्यांनी जवळपास 40 संशयीतांना ताब्यात घेतलं. चौकशी केली. पण काही सापडलं नाही. त्यानंतर शहरातील वेगवेगळी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. शिवाय काही मोबाईल लोकेशन ही चेक करण्यात आली. त्यात पोलिसांनी काही पुरावे मिळाले. पाच दिवसानंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. त्याचे मोबाईल लोकेशन ही मॅच झाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Voter ID Card: घर बसल्या बनवू शकता ऑनलाइन नवीन मतदान ओळखपत्र, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

राजुरा पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली. त्याला पुरावे दाखवले. मोबाइल लोकेशन कुठे होते हे ही त्याला सांगितले. त्यानंतर आपण आता फसलो गेलो आहोत याची जाणीव आरोपीला झाली. त्याने आपला गुन्हा कबूल केला. शिवाय हा खून का केला याची कबुलीही दिली. सिगारेट उधार दिली नाही याचा आपल्याला राग आला. त्यातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.