जाहिरात
This Article is From Jun 22, 2025

Abu Azmi: 'वारीमुळे रस्ता जाम होतो, पण नमाज...' अबू आझमींच्या वक्तव्याने वाद पेटणार?

दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्या विषयी ही वक्तव्य केलं आहे.

Abu Azmi: 'वारीमुळे रस्ता जाम होतो, पण नमाज...' अबू आझमींच्या वक्तव्याने वाद पेटणार?
सोलापूर:

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या आषाढी वारी निमित्ताने राज्यातून वेगवेळ्या ठिकाणाहून दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आझमी यांनी वक्तव्य केलं आहे. वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात. तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र मुसलमानांनी रस्त्यावर नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या वारी सुरू आहे. त्यामुळे दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. अशा वेळी आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वारीमुळे रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे रस्ता हा जाम होतो असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही मशिदी बाहेर नमाज पडू शकत नाही. तसं केलं तर तक्रारी केल्या जातात. राजकीय रंग दिला जातो. एका समाजाला टार्गेट केलं जातं असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Iran Israel War: पाकिस्तानने रंग बदलले, अमेरिकेलाच सुनावले, इराणवरील हल्लाबाबत मोठं वक्तव्य

पण आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आज पर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले जातात त्याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळेस मशिदीमध्ये नमाज पडला जातो. त्यावेळी युपीचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर जर नमाज पडला तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना ही रद्द केला जाईल. आज सोलापूरला येत असताना मला सांगितलं पालखी येते, लवकर जाऊ नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे रस्ता जाम होतो. आम्ही कधी त्याला विरोध केला नाही. असं ते यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Pune Palkhi 2025 Live Check : फुरसुंगी फाट्यावर तुकाराम महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत

दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्या विषयी ही वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांची काही ताकद नाही. त्यांचे आधी तेरा आमदार होते. आता एकही आमदार नाही. जर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या बरोबर गेले तर उद्धव यांचे मोठे नुकसान होईल असं ते म्हणाले. राज ठाकरे हे मराठी विरुद्ध हिंदी, हिंदू विरुद्ध मुस्लीम या गोष्टी करण्यावरच अधिक भर देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आझमी हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकारांबरोबर बोलत होते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com