
छत्रपती संभाजीनगरच्या वाळून एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीचं एन्काउंटर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अमोल खोतकर असं संशयित आरोपीचे नाव आहे. त्याचा या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात घातलेल्या दरोड्यात तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी इतका माल चोरी केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संशयित आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली...
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अमोल खोतकर याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. येथे अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. वडगाव कोल्हाटीमध्ये असताना अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याचं पोलिसांचंच म्हणणं आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर याचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - Beed Accident : रस्त्यांवर मृतदेहांचा खच; बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू
8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली...
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात चोरी झाली होती. यामध्ये तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरी करण्यात आली होती. 15 मेच्या रात्री एक वाजून 53 मिनिटांनी हा दरोडा घालण्यात आला होता. संतोष लड्डा हा मूळचे बीडच्या अंबाजोगाइचे. त्यांची वाळून एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो PVT नावाची कंपनी आहे. ही कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईनसाठी पार्ट बनवते. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो. त्याच्या दीक्षांत सोहळ्यासाठी लड्डा पत्नीसह अमेरिकेला गेले होते. त्यावेळी संधी साधत त्यांच्या घरावर दरोडा टकण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world