जाहिरात

Sambhajinagar Encounter : 'पोलिसांनी माझ्या मुलाची सुपारी घेतली'; एन्काउंटर प्रकरणात आरोपीच्या कुटुंबाचे धक्कादायक आरोप

छत्रपती संभाजीनगर मध्ये दरोडयातील आरोपी अमोल खोतकरच्या बहीण आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Sambhajinagar Encounter : 'पोलिसांनी माझ्या मुलाची सुपारी घेतली'; एन्काउंटर प्रकरणात आरोपीच्या कुटुंबाचे धक्कादायक आरोप

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पोलिसांनी काल 26 मेच्या मध्यरात्री उद्योगपतीच्या घरावर दरोडा घालण्याच्या प्रकरणात एका संशयित आरोपीचा एन्काउंटर केला. अमोल खोतकर असं या संशयित आरोपीचे नाव असून तो एका दरोडा प्रकरणात फरार होता अशी पोलिसांची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात संशयित आरोपी अमोल खोतकर याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी मुलाची सुपारी घेतली..
अमोल खोतकर याचा स्वत:चा चांगला व्यवसाय होता. त्याची स्वत:ची कार होती. अमोल खोतकर याचे वडील ब्रोकर आहेत. त्यांच्या घरातील परिस्थिती सधन आहे. अशी व्यक्ती दरोडा का घालेल असा सवाल अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर हिने केली आहे. तर अमोल खोतकरचे वडील बाबूराव खोतकर म्हणाले, सुपारी घेऊन माझ्या मुलाची हत्या करण्यात आली. दोन ते तीन कोटी घेऊन पोलिसांनी माझ्या मुलाची हत्या केली. त्याने काही गुन्हा केला होता तर ते कोर्टात सिद्ध केलं असतं, त्याला न्यायाधीशांनी शिक्षा केली असती, पोलिसांना त्याला मारण्याचा हक्क कोणी दिला? 

छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडयातील संशयित आरोपी अमोल खोतकरच्या बहीण आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी सुपारी घेऊन त्याचा इन्काऊंटर केला. माझ्या भावाचा हॉटेलचा आणि ट्रक चालवण्याचा व्यवसाय होता. त्यावर अन्याय झालेला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत डेड बॉडी ताब्यात घेणार नसल्याचं अमोलची बहीण आणि वडिलांनी म्हटलं आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar crime: उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपीचा एन्काउंटर, पळण्याच्या प्रयत्नात असतानाच...

नक्की वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar crime: उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपीचा एन्काउंटर, पळण्याच्या प्रयत्नात असतानाच...

'मी आलो नाही तर माझी सुपारी दिली समजा...'
अमोलच्या बहिणीने सांगितलं की, गेल्या महिनाभरापासून तो चिंतेत होता. मी घरी परतलो नाही तर माझी सुपारी दिली समजा असं को वारंवार सांगत होता. पोलिसांनी माझ्या भावाची हत्या केली. त्याला छातीवर, हातावर गोळ्या लागल्या आहेत. त्याला अडवायचं होतं तर पायावर गोळी झाडायची होती. पोलिसांचा त्याला मारण्याचा डाव होता. विशेष म्हणजे दरोडा प्रकरणात आलेली सहाही नावं ही चांगल्या श्रीमंत कुटुंबातील आहेत, त्यांना चोरी करण्याची गरज नाही असंही रोहिनीने यावेळी सांगितलं. 

काय आहे प्रकरण? 

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यामध्ये तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरी करण्यात आली होती. 15 मेच्या रात्री एक वाजून 53 मिनिटांनी हा दरोडा घालण्यात आला होता. संतोष लड्डा हा मूळचे बीडच्या अंबाजोगाइचे. त्यांची वाळून एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो PVT नावाची कंपनी आहे. ही कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईनसाठी पार्ट बनवते. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो. त्याच्या दीक्षांत सोहळ्यासाठी लड्डा पत्नीसह अमेरिकेला गेले होते. त्यावेळी संधी साधत त्यांच्या घरावर दरोडा टकण्यात आला.

संशयित आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली...
छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात सहा संशयित आरोपींची नावं समोर आली होती. यामध्ये अमोल खोतकर याचंही नाव होतं. त्यातून पोलीस त्याला पकडायला गेले होते. पोलिसांनी अमोल खोतकर याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. येथे अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. वडगाव कोल्हाटीमध्ये असताना अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याचं पोलिसांचंच म्हणणं आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर याचा मृत्यू झाला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com