जाहिरात

संभाजीनगरमध्ये 2 मुलांच्या आईची भररस्त्यात हत्या; चुलत दिरासोबतच्या लग्नानंतर 'त्या' एका निर्णयाने घात झाला !

Chhatrapati Sambhajinagar Murder: छत्रपती संभाजीनगरमधील करमाड परिसरात आज (गुरुवार 9 एप्रिल 2026) एका थरारक घटनेने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

संभाजीनगरमध्ये 2 मुलांच्या आईची भररस्त्यात हत्या; चुलत दिरासोबतच्या लग्नानंतर 'त्या' एका निर्णयाने घात झाला !
Chhatrapati Sambhajinagar Murder: शहरातील गजबजलेल्या भागात भर दिवसा हा प्रकार घडला.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar Murder: छत्रपती संभाजीनगरमधील करमाड येथे पेट्रोल पंपावर झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी आता एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असावी असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र आता या घटनेमागील कौटुंबिक वादाचा आणि सख्ख्या नात्यातील रक्ताच्या नात्याचा थरार उघड झाला आहे.

काय आहे प्रकरण?

या घटनेतील मृत पूजा गावंडे यांच्या आयुष्याचा प्रवास संघर्षाचा होता. पूजा यांच्या पतीचे काही काळापूर्वी निधन झाले असून त्यांना 2 लहान मुले देखील आहेत. पतीच्या निधनानंतर पूजा यांचा संसार सावरण्यासाठी साधारण 6 महिन्यापूर्वी त्यांचे लग्न त्यांचा चुलत दीर सत्यम गावंडे याच्याशी लावून देण्यात आले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर काही दिवसांतच सत्यम आणि पूजा यांच्यात खटके उडू लागले आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू लागले होते.

( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )

घटस्फोटासाठी लावला होता तगादा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यम गावंडे याला दुसरे लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला पूजा यांच्याकडून अधिकृतपणे घटस्फोट हवा होता. सत्यम गेल्या काही दिवसांपासून पूजा यांच्याकडे घटस्फोट देण्यासाठी सतत तगादा लावत होता आणि त्यांच्यावर दबाव टाकत होता. मात्र, आपल्या दोन मुलांच्या भविष्याचा विचार करून पूजा घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हती. हाच राग सत्यमच्या मनात धुमसत होता आणि त्याने पूजा यांचा काटा काढण्याचे ठरवले.

( नक्की वाचा : Solapur News : 14 वर्षांची नवरी, 19 वर्षांचा नवरा, 4 महिन्यातच सारा खेळ संपला! प्रकरण वाचून अंगावर येईल काटा )

भरदिवसा पेट्रोल पंपावरच संपवले आयुष्य

आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास सत्यमने पूजा यांचे कामाचे ठिकाण गाठले. करमाड येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पूजा आपले काम करत असताना सत्यम तिथे पोहोचला. तिथे पुन्हा एकदा त्यांच्यात घटस्फोटाच्या कारणावरून जोरदार वाद झाला. याच वादाच्या भरात रागावर नियंत्रण सुटलेल्या सत्यमने आपल्याकडील तीक्ष्ण चाकूने पूजा यांच्या गळ्यावर सपासप वार केले. गळा चिरल्या गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि आपल्या दोन चिमुकल्यांना मागे सोडून पूजा यांचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी सत्यम गावंडे हा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली. अखेर  आरोपीला कचनेर येथून करमाड पोलिसांनी अटक केली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com