HSC Exam : संभाजीनगरमध्ये मास कॉपी प्रकरणात भयंकर प्रताप, खासगी कोचिंग क्लासचे शिक्षक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक 

बारावीचा गणिताचा पेपर असताना हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोसिन शेख, प्रतिनिधी

HSC Exam Mass Copy : छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलं आहे. बारावीचा गणिताचा पेपर असताना हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका खासगी कोचिंग क्लासचे शिक्षक या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असल्याचं समोर आलं आहे. खासगी इंग्रजी शाळांचे शिक्षक देखील पाहत होते पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होते. फुलंब्री तालुक्यातील आदर्श विद्यालयातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी क्लासच्या शिक्षकांची माहिती समोर आली आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Solapur News : बारावीचे चार पेपर दिले, सकाळी अंघोळीला बाथरूममध्ये गेला अन् दार उघडताच कुटुंब हादरलं!

जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते परीक्षा केंद्राच्या आत गेले तेव्हा या केंद्रावर अनेक जण कॉपी पुरवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. जेवढ्या कॉपी येथे आढळल्यात त्या संस्थेतील लोक पुरवत असल्याचं समजत आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. एक दोन कॉपी आढळल्या असत्या तर समजू शकलो असतो मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचं आढळून आल्याचं विकास मीना यांनी सांगितलं. या प्रकरणा मीना यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. संस्थाची मान्यता रद्द करण्याची देखील कारवाई आपण सुरू करणार आहोत. या परीक्षेत अशाप्रकारे कॉपी होऊ नये म्हणून आम्ही अधिकारी प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवून असल्याचं ते म्हणाले. 

Advertisement