जाहिरात

बारावीचे चार पेपर दिले, सकाळी अंघोळीला बाथरूममध्ये गेला अन् दार उघडताच कुटुंब हादरलं!

बारावी परीक्षेचे आतापर्यंत चार पेपर दिल्यानंतर  विद्यार्थ्यांने अचानक आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

बारावीचे चार पेपर दिले, सकाळी अंघोळीला बाथरूममध्ये गेला अन् दार उघडताच कुटुंब हादरलं!

South Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका बारावीच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. विनायक नागनाथ कुंभार असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विनायक कुंभार सकाळी उठून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. त्यानंतर बराच वेळ तो बाथरूमबाहेर आलाच नाही. शेवटी त्याच्या वडिलांनी दरवाज्याचं दार तोडलं. आणि आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. विनायकने बाथरूमच्या खिडकीला टॉवेल बांधून त्याने गळफास घेतला. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने विनायकला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 

Crime news: 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, 6 जणांनी आधी झाडीत नेलं नंतर...

नक्की वाचा - Crime news: 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, 6 जणांनी आधी झाडीत नेलं नंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक कुंभार हा मंद्रुप येथील लोकसेवा विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. तो बारावीत शिकत होता. बारावी परीक्षेचे आतापर्यंत चार पेपर दिल्यानंतर  विद्यार्थ्यांने अचानक आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेलं नाही.  या घटनेची मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: