Chhatrapati Sambhajinagar News : पत्नीची भेट अपूर्णच राहिली, अंगावर झाड कोसळून सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू

चित्ते यांच्या पत्नी घाटीत लॅब टेक्निशियन आहेत. पत्नीला भेटायला जात असताना त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोसिन शेख, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर शहरात वादळी वाऱ्याने कारवर झाड पडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता ही घटना घडली आहे. राजू भास्करराव चित्ते असे मृत अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मिळालेल्या माहितीनुसार, राजू चित्ते हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. चित्ते यांच्या पत्नी घाटीत लॅब टेक्निशियन आहेत. बुधवारी चित्ते पत्नीला भेटण्यासाठी जात होते. याचवेळी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील एम्प्लॉयमेंट ऑफिससमोर अचानक त्यांच्या कारवर जोरदार वाऱ्यामुळे झाड कोसळले. ज्यात चित्ते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

कुटुंबावर दुःखाच डोंगर....

चित्ते यांच्या पत्नी घाटीत लॅब टेक्निशियन असून चित्तेंचा मुलगा आयआयटी दिल्लीत शिकत आहे. तर मुलगी सातवीत आहे. चित्ते यांच्या निधनाची बातमी कळताच चित्ते कुटुंबीयांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Operation Sindoor नंतर सुरक्षेत वाढ, देशभरातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी

मराठवाड्यात अवकाळीने घेतला चौघांचा बळी

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अवकाळी पावसामुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कोडापूर येथील शेतवस्तीवर राहणारे अशोक नंदू म्हस्के हा शेतकरी वीज पडून दगावला. तर  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मगरवाडी येथील सचिन मधुकरराव मगर वीज पडून दगावले. तसेच वडवणी तालुक्यातील अभिमन्यू पांडुरंग नलभे यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच चित्ते यांच्या गाडीवर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. 

तीन जिल्ह्यात ऑरेंज आलर्ट....

मराठवाड्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच आजही बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

Advertisement